The trailer of Amazon Mini TVs new show case To Banta Hai has been released Saam Tv
मनोरंजन बातम्या

Case Toh Banta Hai Trailer Out : रितेश देशमुख सेलिब्रिटींवर करणार आरोप, पाहा 'केस तो बनता है'चा मजेदार ट्रेलर

अॅमेझॉन मिनी टीव्हीचा नवीन शो 'केस तो बनता है' या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना दिसणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड स्टार्सना तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देताना पाहिलं असेल. पण अॅमेझॉन मिनी टीव्हीचा नवीन शो 'केस तो बनता है'(Case Toh Banta Hai Trailer Out) या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना दिसणार आहेत. अभिनेता रितेश देशमुखवर आरोप करण्याचे म्हणजे या शोला होस्ट करण्याचे काम आहे. या मजेदार कॉमेडी शोचा ट्रेलर समोर आला आहे. ज्यामध्ये रितेश देशमुख, वरुण शर्मा आणि कुशा कपिला दिसणार आहेत. या कोर्ट कॉमेडी शोमध्ये रितेश(Ritesh Deshmukh) आणि वरुण सरकारी वकील आणि बचाव पक्ष वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर कुशा न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ट्रेलरमध्ये रितेश, वरुण आणि कुशा सेलिब्रिटींच्या अफेअर्सला कसे समोर आणतात हे दाखवण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये वरूण धवन, करीना कपूर खान, करण जोहर, सारा अली खान, अनिल कपूर, रोहित शेट्टी आणि बादशाह यांसारखे स्टार्स दिसत आहेत. हा कोर्टरूम ड्रामा शो प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा कोर्टरूम बनताना दिसणार आहे.

या शोबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाला, 'मी यापूर्वी अनेक प्रोजेक्ट्स केले आहेत, जे कॉमेडी जॉनरचे आहेत. पण 'केस तो बना है' हा खूप खास प्रोजेक्ट आहे. या शोची संकल्पना खूपच मजेदार आहे. भरपूर मसाला असलेली ही एक धमाकेदार केस आहे'.

त्याचवेळी, शोमध्ये सेलिब्रिटींच्या वतीने वकील म्हणून असलेला वरुण शर्मा म्हणाला, 'मला अतरंगी कॉमेडी किती आवडते, हे प्रेक्षक आणि इंडस्ट्रीपासून काही लपलेले नाही. रितेश आणि कुशाला भेटणे आणि नंतर चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय व्यक्तींसोबत मजा करणे यापेक्षा मला काहीही गंमतीशीर वाटत नाही'.

रितेश देशमुख, वरुण शर्मा आणि कुशा कपिलाचा 'केस तो बनता है' हा कॉमेडी शो २९ जुलैपासून अॅमेझॉन मिनी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोला प्रेक्षक भरघोस पसंती देतील असे या शोच्या निर्मात्यांचा विश्वास आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मामाच्या घरून परतताना दिव्यांग तरुणीवर सामूहिक बलात्कार, बचावासाठी पळत राहिली पण...; घटनेपूर्वीचा CCTV व्हिडीओ समोर

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, महिला नेत्या करणार अजित पवार गटात प्रवेश

Diet Mistakes : रोज सकाळी उपाशी पोटी चिया सीड्स खाणं आत्ताच टाळा, अन्यथा होईल मोठं नुकसान

Rain Alert : विदर्भात पुढील आठवडाभर पावसाचा इशारा; पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT