sky force trailer Google
मनोरंजन बातम्या

Sky Force Trailer : 'जरा याद करो कुर्बानी...' दमदार डायलॉग्जबाजी सह अक्षय कुमारच्या स्काय फोर्सचा ट्रेलर प्रदर्शित

Sky Force Trailer : अक्षय कुमार आणि वीर पहाडिया स्टारर स्काय फोर्सचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचे दमदार संवाद ऐकायला मिळतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sky Force Trailer : नवीन वर्ष सुरू झाले असून अक्षय कुमारने त्याचे आगामी चित्रपट एकामागून एक प्रदर्शित करण्याची तयारी केली आहे. बऱ्याच दिवसांपासून अक्षय कुमार हिट चित्रपटाच्या शोधात आहे. पण त्याचा शोध अजून संपलेला नाही. दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीला अक्षय कुमारने मोठ्या पडद्यावर येण्याची तयारी केली आहे. अभिनेत्याच्या आगामी 'स्काय फोर्स' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 24 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

ऐतिहासिक हवाई हल्ल्यावर आधारित 'स्काय फोर्स' या एरियल ॲक्शन फिल्ममध्ये अक्षय कुमारसोबत वीर पहाडिया देखील मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटातून वीर पहाडिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो अभिनेत्री सारा अली खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. जी वीर पहाडियाच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसत आहे. एक काळ असा होता की सारा अली खान आणि वीर पहाडिया एकमेकांना डेट करायचे. जरी आता दोघे चांगले मित्र आहेत.

स्काय फोर्सचा दमदार ट्रेलर

स्काय फोर्सचा ट्रेलर व्हॉईसओव्हरने सुरू होतो, ज्यामध्ये पाकिस्तान भारताला आव्हान देताना दिसत आहे. त्यानंतर लगेचच हवाई हल्ले आणि स्फोट होताना दिसत आहेत. अक्षय कुमार आणि वीर पहाडिया पुढच्या दृश्यात प्रवेश करतात. जे हल्ल्यापासून पळून जात आहेत. स्काय फोर्सच्या ट्रेलरमध्ये अनेक दमदार संवादांचा वापर करण्यात आला आहे. अक्षय कुमार शेजाऱ्यांना सांगावे लागेल की आपणही घुसू शकतो आणि मारू शकतो, असे म्हणताना ऐकायला मिळत आहे. तर, बॅकग्राऊंडला लता मंगेशकर यांचे ए मेरे वतन के लोगो गाणे वाजत आहे .

स्काय फोर्सच्या कथेबद्दल सांगायचे तर, भारताने पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर केलेल्या हल्यावर हा चित्रपट आधारित आहे. 1965 मध्ये भारतीय आणि पाकिस्तानी हवाई दलांमध्ये चकमक झाली होती. 6 सप्टेंबर रोजी पाकिस्तानने पठाणकोट आणि हलवारा एअरबेसवर हल्ला केला, त्यानंतर भारतीय हवाई दलाने सरगोधावर हल्ला केला. त्यावेळी सरगोधा हे आशियातील सर्वात मजबूत एअरबेस मानले जात होते. यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय वैमानिकांनी हल्ला करून पाकिस्तानच्या सर्वात सुरक्षित एअरबेसचे मोठे नुकसान केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT