Rangada Marathi Movie Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rangada Movie : मातीतली अस्सल कुस्ती अन् बैलगाडा शर्यतीचा थरार 'रांगडा'मध्ये दिसणार, पाहा जबरदस्त Trailer

Rangada Marathi Movie Trailer : महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती आणि बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेल्या 'रांगडा' चित्रपटाचा धडाकेबाज ॲक्शन असलेला ट्रेलर रिलीज झाला आहे.

Chetan Bodke

महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती आणि बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेल्या 'रांगडा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. लव्हस्टोरी, पॉलिटिक्स आणि ॲक्शन असलेल्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपूर्वीच टीझर आणि पोस्टर रिलीज झाला होता. आता त्यानंतर ट्रेलर रिलीज झालेला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये १२ जुलै रोजी रिलीज होणार आहे.

चित्रपटाचा ट्रेलर आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेला छंद आणि त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष दाखवण्यात आलेला आहे. बलदंड नायक, खलनायक, लव्हस्टोरी, स्थानिक राजकारण, तुफान ॲक्शनचा धडाकेबाज तडका ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. बैलगाडा शर्यत आजही खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणावर भरवली जाते. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रंगणारा थरार आणि रांगडेपणाचा अस्सल अनुभव आता प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या बॅनरखाली योगेश बालवडकर, किरण फाटे,राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी 'रांगडा' चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर बाबाजी सातपुते आणि युवराज पठारे यांनी सहनिर्मिती केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आयुब हवालदार यांनी केले आहे. भूषण शिवतारे, मयुरी नव्हाते, अमोल लंके, भीमराज धनापुणे, अतिक मुजावर, संदीप (बापु)रासकर, राजेंद्र गुंजाळ, पल्लवी चव्हाण, निकिता पेठकर, निलेश कवाद या कलाकारांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, दोन राष्ट्रीय कुस्तीपटू चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. अरुण वाळूंज, प्रमोद अंबाडकर यांनी लिहिलेल्या गीतांना रोहित नागभिडे यांचे सुमधुर संगीत लाभले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT