The third song 'Afat' from the movie Ligar has also been released. Saam Tv
मनोरंजन बातम्या

Liger song Aafat out : समुद्रकिनारा अन् विजय-अनन्याचा रोमान्स; सोशल मीडियावर 'आफत'

लाइगर या सिनेमाचे तिसरे गाणे 'आफत' देखील प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात पुन्हा एकदा अनन्या आणि विजयची रोमॅंटिक केमिस्ट्री पाहायला मिळते आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Liger song Aafat out News | मुंबई : साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda)आणि अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Panday) यांचा बहुप्रतीक्षित 'लाइगर'(Liger) सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. हा सिनेमा रीलीज होण्यास आता काही दिवसच उरलेले आहेत. या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. अलीकडेच सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर त्याचबरोबर 'अकडी पकडी' आणि 'वाट लगा देंगे' या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

सिनेमाच्या ट्रेलरमधील विजय देवरकोंडाचे डायलॅाग आणि डॅशिंग अंदाज थक्क करणारा आहे. नुकतेच या सिनेमाचे तिसरे गाणे 'आफत' देखील प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात पुन्हा एकदा अनन्या आणि विजयची रोमॅंटिक केमिस्ट्री पाहायला मिळते आहे.

गाण्यात रम्या कृष्णन किचनमध्ये विजय देवरकोंडासाठी जेवण बनवताना दिसत आहे. त्याच दरम्यान अनन्या पांडेची एन्ट्री होते. अनन्या विजयकडे येण्याची परवानगी मागते, त्यावर विजय देवराकोंडा त्याच्या आईकडे पाहतो आणि तिला परत जाण्यास सांगतो. पण अनन्या एकत नाही आणि हात जोडून पुन्हा विजय देवराकोंडाला आत येण्याची विनंती करते. पण यावेळी विजयच बाहेर जातो आणि अनन्या तिथे येऊन विजयला ओढत लांब घेऊन जाते. त्यानंतर या गाण्यामध्ये दोघांचे रोमँटिक सीन दाखवण्यात आले आहेत.

या सिनेमातून विजय देवरकोंडाही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, तर अनन्या पांडेही या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करत आहे. कारण हा सिनेमा हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध बॉक्सिंगपटू माईक टायसन देखील या सिनेमातून भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

'लाइगर' हा एक एक स्पोर्ट्स ड्रामा सिनेमा आहे. साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, करण जोहर या सिनेमाचा निर्माता आहे. या सिनेमात विजय देवरकोंडासोबत अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय रम्या कृष्णन, रोनिक रॉय, विष्णू रेड्डी आणि मकरंद देशपांडे हे देखील सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा बहुचर्चित चित्रपट २५ ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cooking Tips: सुक्या भाजीत मीठ जास्त पडलं? घाबरू नका; या 6 सोप्या ट्रिक्सने खारटपणा होईल कमी

Maharashtra Local Body Election Results 2025 Live : तुमचा नगराध्यक्ष कोण? पालिकेवर सत्ता कुणाची? वाचा लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Local Body Election Result : मतमोजणीआधीच 3 ठिकाणाचे निकाल समोर, ३ महिलांच्या नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब

Mumbai : ठाण्याहून CSMT चा प्रवास सुसाट होणार, महत्त्वाचा उड्डाणपूल BMC बांधणार, वाचा कसा असेल नवा मार्ग

Cancer threat India: भारतासाठी मोठा धोका बनतोय कॅन्सर! 2040 पर्यंत रूग्णांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहोचण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT