Amitabh Bachchan Upcoming Movie Uunchai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Uunchai : अमिताभ बच्चन यांच्या 'उचाई' चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर फ्रेंडशिप डेला रिलीज

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा बहुप्रतिक्षित 'उचाई' हा चित्रपट आता लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amitabh Bachchan Upcoming Movie |मुंबई : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा बहुप्रतिक्षित 'उचाई'(Uunchai) हा चित्रपट आता लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची उत्कंठा पाहता या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेला राजश्री प्रोडक्शनचा हा चित्रपट फ्रेंडशिप डेच्या दिवशी प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan), अनुपम खेर आणि बोमन इराणी हिमालयाच्या शिखरांवर ट्रेकिंग करताना दिसत आहेत. पोस्टरच्या पार्श्वभूमीवर माउंट एव्हरेस्टचे दृश्य दाखवण्यात आले आहे. तसेच पोस्टरच्या वरच्या बाजूला 'मैत्री ही त्यांची प्रेरणा आहे' अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. यावरून स्पष्टपणे दिसून येते की हा चित्रपट मैत्रीवर आधारित आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडणार आहे.

अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी हे सूरज बडजात्या यांच्या आगामी 'उचाई' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर परिणीती चोप्रा या चित्रपटात टुरिस्ट गाईडची भूमिका साकारत आहे. याशिवाय नीना गुप्ता आणि सारिका देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या कलाकारांशिवाय अभिनेता डॅनी डेन्झोंगपा आणि नफिसा अली सोधी हे देखील चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचे काही शॉट्स हिमालय पर्वताच्या सर्वोच्च शिखरावर १३ हजार फूट उंचीवर शूट करण्यात आले आहेत.

'उचाई' हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'उचाई' हा राजश्री प्रॉडक्शनचा ६० वा चित्रपट आहे. तसेच, सूरज बडजात्या यांचा हा ७ वा दिग्दर्शकीय चित्रपट आहे. राजश्रीचे कमलकुमार बडजात्या, आणि अजित कुमार बडजात्या हे या चित्रपटासाठी निर्माते म्हणून काम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ना सिग्नल, ना ट्रॅफिक; मुंबईतून थेट २५ मिनिटांत गाठा ठाणे, प्रकल्प कधी पूर्ण होणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडेंविरोधात धुळ्यात मराठा समाज आक्रमक

ज्यांना लोकांनी चार वेळा डांबर फासलंय त्यांच्यावर काही बोलायचं नाही उदय सामंत यांचा रोख कोणाकडे? VIDEO

Accident News : दुर्दैवी! बोहोल्यावर चढण्याआधी काळाचा घाला, नवरदेवासह एकाच घरातील तीन भावांचा भीषण अपघातात मृत्यू

Mumbai food: गरम चहा आणि बन मस्का....! मुंबईतील सुप्रसिद्ध इराणी कॅफेंना एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT