Brahmastra Story Leak | मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (ranbir Kapoor) प्रदीर्घ काळानंतर सिनेविश्वात पुनरागमन करत असून त्याच्या पुनरागमनानंतरचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'शमशेरा'ला लोकांची खास पसंती मिळाली नाही. आता लवकरच रणबीर आलियाचा 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची चाहते अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जीच्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, नागार्जुन, दीपिका पदुकोण असे मोठे कलाकार आहेत. परंतु रिलीजपूर्वीचं सोशल मीडियावर 'ब्रह्मास्त्र'ची कथा लीक झाली आहे. या चित्रपटात खारी खलनायक मौनी रॉय नसल्याचा अंदाज लावला जात आहे.
सोशल मीडियावर समोर येत असलेल्या वृत्तांनुसार खरी खलनायक मौनी रॉय नसून आलिया भट्ट असेल. सोशल मीडिया युजर्सचे असा म्हणणे आहे की आलिया भट्ट रणबीर कपूरला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवेल आणि शिवाच्या माध्यमातून इतर सर्व शस्त्रांपर्यंत पोहोचेल. ईशा म्हणजेच आलिया भट्ट ही देखील स्वतः एक शस्त्र असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या चित्रपटात दीपिकाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या भूमिकेबद्दल अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात दीपिका 'जल अस्त्र' असणार आहे. या चित्रपटात बिग बी शिवाचे गुरूअसणार आहेत. परंतु अमिताभ बच्चन यांची खरी व्यक्तिरेखा छुपे कारस्थान करणारी असल्याचीही अटकळ बांधली जात आहे. आता हे वृत्त कितपत खरे आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.
बॉलिवूड चित्रपट त्यांच्या सर्वात धोकादायक टप्प्यातून जात आहेत. नुकतेच प्रदर्शित झालेल्या एकापेक्षा एक चित्रपटांना बॉयकॉट ट्रेंडला सामोरे जावे लागले आहे. याच बॉयकॉटच्या शर्यतीत प्रेक्षकांनी अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचाही समावेश केला आहे. अशा परिस्थितीत ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून बॉलिवूडला खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट बॉलिवूडची बुडती बोट पार करू शकणार की बॉक्स ऑफिसवर अवघ्या काही कोटींवर घसरणार हे पाहणे बाकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.