Bade Miyan Chote Miyan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bade Miyan Chote Miyan: ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ च्या शूटिंगला सुरुवात, चित्रपटात होणार 'या'अभिनेत्रीची एन्ट्री

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Akshay Kumar Upcoming Movie Update: बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच अक्षय कुमारने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली, तेव्हापासून त्याचे चाहते अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांच्या प्रतिक्षेत आहेत. टायगर जिंदा है,सुलतान आणि भारत या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर अक्षयच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. नुकतीच अक्षयच्या आगामी चित्रपटांबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.

सोशल मीडियावर अक्षय कुमार याने त्याच्या आगामी नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. सोशल मीडियावर पोस्ट लिहित अक्षयने त्याच्या चाहत्यांना माहिती दिली. केवळ घोषणाच नाही तर, अक्षयने त्याच्या आगामी चित्रपटाचे म्हणजेच ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’चे शूटिंग देखील सुरू केले असल्याचे सांगितले. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत टायगर श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकेत आहे. अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे तर पूजा एंटरटेनमेंट अंतर्गत चित्रपटाची निर्मिती होते आहे.

‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ चित्रपटाचा मुहूर्त २१ जानेवारीला मुंबईत झाला. अक्षय कुमारने ट्विटरवर तीन फोटो शेअर केले ज्यामध्ये एका फोटोत तो टायगर श्रॉफ, जॅकी भगनानी आणि अली अब्बास जफरसोबत दिसला. अक्षय कुमारच्या या नव्या चित्रपटांच्या स्टारकास्ट बाबत चाहते उत्सुक आहेत. चित्रपटात कोण अभिनेत्री असणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना चित्रपटाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. चित्रपटात दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला भाग पूर्ण केला आहे. दुसऱ्या भागाचे शुटींग मार्चमध्ये स्कॉटलैंड आणि अबू धाबी येथे होणार असल्याची शक्यता आहे. सिनेमाविषयी सोनाक्षीने म्हटले आहे की ती ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ या चित्रपटात काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. अक्षयसोबत काम करण्याची नवी संधी मिळाली आहे. टायगर सोबत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. अली अब्बास जफऱ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ ब्लॉकबस्टर चित्रपट ठरेल.

सोनाक्षी सिन्हा तिच्या सिनेकारकिर्दीपासून दूर असली तरी २०२३ ह्या वर्षात सोनाक्षीकडून तिच्या चाहत्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. यावर्षी सोनाक्षी संजय लिला भंसालीच्या ‘हिरामंडी’ आणि टायगर बेबीच्या ‘दहाड’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय सोनाक्षी अक्षय कुमारच्या ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत सोनाक्षी दिसणार आहे.

Edited By- Manasvi Choudhary

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

SCROLL FOR NEXT