The Sabarmati Report SAAM TV
मनोरंजन बातम्या

The Sabarmati Report : 'द साबरमती रिपोर्ट'चा आधी ट्रेलर आला, आता नायकानंच दिली घटनास्थळाला भेट

Vikrant Massey : 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचा अभिनेता विक्रांत मॅसीने गोध्रा रेल्वे स्टेशनला अचानक भेट दिली आहे.

Shreya Maskar

'द साबरमती रिपोर्ट'चा (The Sabarmati Report) नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. खऱ्या अर्थाने 'द साबरमती रिपोर्ट'ने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. देशाला हादरवून सोडणाऱ्या घटनेची झलक यातून दिसली. प्रेक्षक या घटनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशात अभिनेता विक्रांत मॅसीने गोध्रा रेल्वे स्टेशनला अचानक भेट दिली आहे.

प्रमुख अभिनेता विक्रांत मॅसीने (Vikrant Massey) गोध्रा रेल्वे स्थानकाला भेट देऊन सर्वांनाच चकित केले आहे. साबरमती अहवालात गुजरातमधील गोध्रा स्थानकाजवळ २७ फेब्रुवारी २००२ रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये झालेल्या दु:खद घटनेची माहिती दिली आहे. त्यामुळे विक्रांतची गोध्रा रेल्वे स्टेशनला (Godhra Railway Station) भेट हा चित्रपटाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय.

बालाजी मोशन पिक्चर्स, बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड प्रस्तुत विभाग, एक विकीर फिल्म्स प्रॉडक्शन, विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा अभिनीत 'द साबरमती रिपोर्ट', धीरज सरना दिग्दर्शित आणि शोभा कपूर, एकता आर कपूर, अमूल व्ही मोहन निर्मित आणि अंशुल मोहन, झी स्टुडिओज द्वारे जगभरात प्रसिद्ध होणार आहे. 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT