Ek Villain Returns Image
Ek Villain Returns Image  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ek Villain Returns : चित्रपटाचा पोस्टर यूपी पोलिसांनी केला रिट्विट, जाणून घ्या नेमकं काय झालं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक मोहित सुरीचा 'एक विलेन्स रिटर्न्स'(Ek Villain Returns) हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम (John Abraham), अर्जुन कपूर(Arjun Kapoor), दिशा पाटनी(Disha Patani) आणि तारा सुतारिया(Tara Sutaria) हे कलाकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज केला आहे चित्रपटात जबरदस्त अँक्शन सोबत सस्पेंन्सही दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही प्रचंड उत्साही आहेत. नुकताच या चित्रपटाचा एक पोस्टर ट्विटरवर यूपी पोलिसांनी रिट्विट केले आहे. त्यामुळेच या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

चित्रपट आणि चित्रपटांच्या गाण्यांबद्दल अनेकदा मजेदार ट्विट करणार्‍या यूपी पोलिसांनी नुकतेच एक ट्विट केले. या चित्रपटाच्या नावाद्वारे ते मजेदार पद्धतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. यूपी पोलिसांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि ट्विट केले, 'कोणाचेही खलनायक बनू नका... कारण गुन्ह्याचा सीक्वल जेलमध्येच होतो. तुमच्या रस्त्यातील अडथळे दूर करण्यासाठी डायल करा ११२ #NovillinReturns

सोशल मिडीयावर यूपी पोलिसांनी केलेलं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल आहे. यूपी पोलीसांच्या या मजेदार ट्विटमुळे सोशल मीडिया यूजर्स त्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक करत आहेत. त्यांनी ज्याप्रकारे विनोदातून खलनायकांना इशारा दिला, त्यामुळे सोशल मीडिया यूजर्स यूपी पोलिसांची प्रशंसा करत आहेत.

'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट २९ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतरही समजत नाही की यावेळी खलनायक नक्की कोण आहे - जॉन अब्राहम की अर्जुन कपूर ? ट्रेलरमध्ये असे सांगण्यात आले आहे की, यावेळी हा हल्ला त्या मुलींवर केला जात आहे ज्यांच्यावर कोणा ना कोणाचे एकतर्फी प्रेम आहे. आता 'एक व्हिलन रिटर्न्स'चा बॉक्स ऑफिसवर किती परिणामकारक ठरणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

Vivo V30e 5G भारतात लॉन्च; 50MP फ्रंट कॅमेऱ्यासह मोबाईलमध्ये आहेत अनोखे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Today's Marathi News Live : मंदा म्हात्रे यांनी थेट राजीनामा नाट्यावर केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT