Mega Blockbuster Saam Tv
मनोरंजन बातम्या

मेगा ब्लॉकबस्टर 'खोदा पहाड निकाल चुहा' हा सिनेमा नाही तर भलतंच काही...

ट्रेलरही प्रदर्शित करत 'मेगा ब्लॉकबस्टर'चा खुलासा करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण(Deepika Padukone) आणि कपिल शर्मा(Kapil Sharma) ही तगडी स्टारकास्ट असलेल्या 'मेगा ब्लॉकबस्टर'ची घोषणा करण्यात आली होती. नुकताच याचा ट्रेलरही प्रदर्शित झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याची चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर आज 'मेगा ब्लॉकबस्टर'चा खुलासा करण्यात आला आहे.'मेगा ब्लॉकबस्टर' हा चित्रपट किंवा वेबसीरिज नसून एका अॅपची जाहिरात कॅम्पेनिंग आहे. परंतू चित्रपट असल्यासारखीच याची घोषणा करण्यात आली होती, त्यामुळे चाहत्यांचा भ्रम निरास झाला आहे.

काही दिवसांपूर्वी 'मेगा ब्लॉकबस्टर'ची घोषणा करण्यात आली होती, घोषणा झाल्यापासून सर्वांनाच उत्सुकता होती ती, ट्रेलरची. अखेर ट्रेलरही आला, पण ट्रेलरमध्ये काही तरी वेगळंच निघालं. हा चित्रपट किंवा वेबसीरिज नसून एका अॅपची जाहिरात आहे. यामध्ये विनोदवीर कपिल शर्मा, सौरव गांगुली, रोहित शर्मा, रणवीर सिंह, रश्मिका मंदाना आणि दीपिका पदुकोण दिसत आहेत. हे सर्व कलाकार ग्राहकांना खास ऑफर देताना दिसत आहेत. हा ट्रेलर रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत 'मिशोचा मेगा ब्लॉकबस्टर सेल' अशी टॅगलाईन दिली आहे.

मिशो अॅप हे एक कपडे खरेदी करण्याची वेबसाईट आहे. यावर पुरूषांसाठी आणि महिलांसाठी कपडे, घड्याळ, घरगुती वापरण्याच्या गोष्टी या वेबसाईटवरुन खरेदी करू शकता. ही खास ऑफर ग्राहकांसाठी २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर पर्यंत असणार आहे. या ऑफरवर ग्राहकांना भरभक्कम सुट मिळणार आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी स्टार कास्ट एका जाहिरातीत एकत्र दिसत आहेत. बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील मातब्बरांना एकाच स्क्रिनवर एकत्र आणणे साधी गोष्टी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT