Tiger 3 - The Marvels Clash On Indian Box Office Saam TV
मनोरंजन बातम्या

Tiger 3 - The Marvels Realising Back To Back : भाईजानची चिंता वाढणार ? टायगर 3 - मार्व्हल्स एकाच वेळी बॉक्स ऑफिसवर धडकणार

Salman Khan Movie In Trouble : मार्व्हल्स विरुद्ध टायगर 3 हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

Pooja Dange

The Marvels Released Affect Tiger 3 Collection : पठान चित्रपटाला कोणीतरी कल्पना करू शकणार नाही इतके यश मिळाले. या चित्रपटानंतर प्रेक्षकांना उत्सुकता आहे YRF च्या टायगर 3 चित्रपटाची. प्रेक्षकांकडे हा चित्रपट पाहण्याची अनेक करणे आहेत.

या चित्रपटाची क्रेज असण्याचे पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे सलमान खान. सलमान खान त्याच्या टायगर या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. या चित्रपट या दिवाळीत येणार आहे. परंतु याच दरम्यान 'द मार्व्हल्स' भारतीय बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

शाहरुख खानच्या कमबॅक चित्रपट पठान पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी केल्याचे आपण पाहिले आहे. टायगर थ्री चित्रपटगृहात आल्यावर असाच उत्साह अपेक्षित आहे. या चित्रपटामधेय SRK चा कॅमिओ देखील आहे हे विसरता काम नये. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एक धमाका पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाची नेमकी तारीख अद्याप समोर आली नसली तरी टायगर 3 या दिवाळीत रिलीज होणार असल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. हा एक धमाकेदार चित्रपट असणार आहे.

परंतु फक्त सलमान खानचा चित्रपट यावेळी बॉक्स ऑफिसवर असणार नाही, कारण द मार्व्हल्सच्या हा हॉलिवूड चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. मार्व्हल्स 10 नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीच्या काळात प्रदर्शित होणार आहे.

मार्व्हल्स हा भारतातील एक ब्रँड आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मार्व्हल्सचा एक चाहता वर्ग आहे. मार्केटिंगशिवाय त्याच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिस चांगली सुरुवात होते. द मार्व्हल्स हा आधीच खूप गाजलेला प्रोजेक्ट आहे.

मार्व्हल्स विरुद्ध टायगर 3 हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. मार्व्हल्समुळे टायगर ३चे पहिल्या दिवशी 50 कोटींचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट अपूर्ण राहू शकते.

पठानने पहिल्या दिवशी 50 कोटी कमावले होते, टायगर 3 हा देखी पहिल्या दिवशी तुफान कमाई करेल अशी अपेक्षा आहे. पण मार्व्हल्स अडथळा असल्याने टायगर ३ ला हे ध्येय गाठणे थोडे कठीण जाऊ शकते. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT