Harish Roy Saam Tv
मनोरंजन बातम्या

चौथ्या स्टेजच्या कॅन्सरने त्रस्त 'केजीएफ' स्टारची प्रकृती दिवसेंदिवस बिकट, शस्त्रक्रियेसाठीही नाहीत पैसे

दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या 'केजीएफ' चित्रपटात खासीम चाचाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ कन्नड अभिनेता हरीश रॉय कर्करोगाशी झुंज देत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या(Yash) 'केजीएफ'(KGF) चित्रपटात खासीम चाचाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ कन्नड अभिनेता हरीश रॉय कर्करोगाशी झुंज देत आहेत. हरीश रॉय सध्या घशाच्या कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात आहे. त्याने अलीकडेच एका यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याच्या आजराबद्दल सांगितले. हरीश रॉयने खुलासा केला आहे की तो गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही तो या आजाराशी झुंज देत होता.

एका यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत त्यांने सांगितले की, यापूर्वी त्याला थायरॉईड होता, ज्याचे नंतर कर्करोगात रुपांतर झाले. गेल्या तीन वर्षांपासून तो कर्करोगाने त्रस्त असून त्याच्याकडे उपचारासाठीही पैसे नव्हते. अनेक प्रोजेक्ट गमावण्याच्या भीतीने हरीश रॉयने आपल्या आजाराचे निदानच केले नाही. त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हणून त्याने आपली शस्त्रक्रियाही पुढे ढकलली आणि 'के.जी.एफ़: चॅप्टर २' च्या रिलीजची वाट पाहिली. आता तो कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात असून त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.

हरीश रॉयने यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आजाराचा खुलासा करत म्हणाला की, 'परिस्थिती तुम्हाला मोठेपणा देऊ शकते किंवा तुमच्यापासून सगळ काही हिसकावून घेऊ शकते. पळून जाण्याचे माझे भाग्य नाही. मी तीन वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत आहे. केजीएफच्या शूटिंगदरम्यान मी लांब दाढी ठेवण्याचे एक कारण म्हणजे या आजारामुळे माझा चेहरा सुजला होता. सूज लपविण्यासाठी मी दाढी वाढवली. मी पैशांच्या कमतरतेमुळे, माझे चाहते आणि इंडस्ट्रीतील लोकांकडून मदत घेण्यासाठी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, परंतु मी तो व्हीडीओ पोस्ट करू शकलो नाही'.

हरीश रॉय २०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'के.जी.एफ़: चॅप्टर १' आणि 'के.जी.एफ़: चॅप्टर २' या दोन्ही चित्रपटांमध्ये रॉकी भाईच्या काकांच्या भूमिकेत दिसला आहे. याशिवाय त्याने 'बंगलोर अंडरवर्ल्ड', 'धन धना धन' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो २५ वर्षांहून अधिक काळ कन्नड सिनेमात काम करत आहेत. 'के.जी.एफ़: चॅप्टर २' बद्दल बोलायचे झाले तर यश स्टारर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १२०० कोटींहून अधिक कमाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Jobs: रेल्वेत १,२०,५७९ पदांसाठी भरती; मागच्या ११ वर्षात लाखो पदे भरली; वाचा सविस्तर

नॅशनल हायवेवर भीषण अपघात; भरधाव डंपरची बसला धडक, १० जणांचा जागीच मृत्यू, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Suraj Chavan Wife Emotional: सासरी जाताना भावाच्या गळ्यात पडून रडली संजना, सुरजच्या बायकोचा भावनिक व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

शिवाजी महाराजांना छत्रपती का संबोधलं जातं? जाणून घ्या ऐतिहासिक अर्थ

SCROLL FOR NEXT