The Kerala Story Team Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Kerala Story Team Accident: हिंदू यात्रेत सहभागी होण्याआधी अदा शर्मासह 'द केरला स्टोरी' टीमचा अपघात

Adah Sharma-Sudipto Sen: अदा शर्मा आणि सुदिप्तो सेन ट्विट करत शेअर केली हेल्थ अपडेट.

Pooja Dange

The Kerala Story Team:'द केरला स्टोरी'चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा करीमनगर येथील हिंदू एकता यात्रेत रविवारी, 14 मे रोजी सहभागी होणार होते. रस्त्यात कलाकारांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, टीमचा अपघात झाला असून ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अदाहने स्वतःबद्दल आणि टीमबद्दल एक विशेष आरोग्य अपडेट शेअर केली आहे. अदा शर्माने सांगितले की, संपूर्ण टीम ठीक आहे आणि काही गंभीर घडलेले नाही.

रात्री 8 वाजता अदा शर्माने संपूर्ण प्रकरण स्पष्ट केले आणि तिच्या चाहत्यांना काळजी करू नका असे सांगितले. अदा शर्माने लिहिले, 'मी ठीक आहे मित्रांनो. आमच्या अपघाताच्या सततच्या बातम्यांमुळे आम्हाला खूप मेसेज येत आहेत. संपूर्ण टीम, आम्ही सर्व ठीक आहोत, काहीही गंभीर नाही, काहीही महत्त्वाचे नाही परंतु काळजीबद्दल धन्यवाद. (Latest Entertainment News)

अदाच्या आधी, सुदीप्तो यांनी देखील पोस्ट केली होती की काही 'वैद्यकीय कारणामुळे'मुळे ते यात्रेला उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी ट्विटर करत लिहिले की, 'आज आम्ही करीमनगरला तरुणांच्या बैठकीत आमच्या चित्रपटाबद्दल बोलणार होतो. दुर्दैवाने काही आपत्कालीन आरोग्य समस्यांमुळे आम्ही प्रवास करू शकलो नाही. करीमनगरवासीयांची मनापासून माफी मागतो. आमच्या मुली सुरक्षित राहाव्यात म्हणून आम्ही हा चित्रपट बनवला आहे. कृपया आमच्या #HinduEkthaYatra ला पाठिंबा देत रहा.'

'द केरला स्टोरी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. अदा शर्मा स्टारर चित्रपटाने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजेच 13 मे रोजी 19.50 कोटी रुपयांची कमाई करून सर्वोत्कृष्ट कमाई केली आहे, हे या चित्रपटाचे आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे.

हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. तरण आदर्श म्हणतात, शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर 'पठान', रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर 'तू झुठी...' नंतर सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' नेट बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला पार करेल. १०० कोटींचा टप्पा पार करणारा हा चौथा चित्रपट ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur: कोल्हापूरमध्ये चाललंय काय? हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना मारहाणीचे सत्र सुरूच, आणखी एक धक्कादायक VIDEO समोर

Ola- Uber: 'राईड कॅन्सल केली तर...'; ओला-उबर, रॅपिडोसह सर्व ॲप आधारित चालक वठणीवर येणार, नव्या कायद्यात काय?

BMC Election : बीएमसीत आमचे वाघ... जैन मुनींकडून नव्या पक्षाची स्थापना, निवडणुकीत कुणाला झटका बसणार?

Prarthana Behere: पवित्र रिश्ता फेम प्रार्थना बेहरेविषयी या गोष्टी माहित आहेत का?

SAIL Recruitment: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी; महिन्याला १.६० लाखांचं पॅकेज; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT