The Kerala Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Kerala Story: 'द केरळ स्टोरी'चे निर्माते सुप्रीम कोर्टात जाणार, प. बंगालमधील बंदी उठवण्याची करणार मागणी

Latest News: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी 'द केरळ स्टोरी' या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.

Priya More

Delhi News: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाला पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवण्यात यावी यासाठी निर्माते विपुल शाह सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटावरील बंदीचा वाद आधीच सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती. पण आता या चित्रपटाचे निर्मातेच आता सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे समोर आले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी 'द केरळ स्टोरी' या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली. 'द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना' टाळण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने चित्रपटावर तत्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले होते. या चित्रपटावर बंदी घालणारे पश्चिम बंगाल हे पहिले राज्य आहे. यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अशी कारवाई त्यांच्या समजण्यापलीकडची असल्याचे सांगितले होते.

चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी सांगितले की, 'ते टीएमसी सरकारने घातलेल्या बंदीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहेत.' तर, पश्चिम बंगाल सरकारने सांगितले की, 'द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच बंदीचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही सिनेमागृहावर कारवाई केली जाणार असल्याचे देखील पश्चिम बंगाल सरकारने जाहीर केले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, 'द काश्मीर फाइल्स' समाजातील एका वर्गाला अपमानित करण्यासाठी तयार करण्यात आला होता. तर 'द केरळ स्टोरी' हा विकृत चित्रपट आहे. ज्याचा उद्देश दक्षिणेकडील राज्याला बदनाम करण्याचा आहे.

म्हत्वाचे म्हणजे 'द केरळ स्टोरी'मध्ये तीन महिलांची शोकांतिका दाखवण्यात आली आहे. लग्नानंतर इस्लाम स्वीकारल्यानंतर मानवी तस्करी करून त्यांना आयएसआयएसच्या (ISIS) कॅम्पमध्ये नेले जाते. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

Pune Crime : गार वडापाव दिल्याचा राग; स्नॅक्स सेंटर मालकाला जबर मारहाण

Maharashtra News Live Updates: मविआचा मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार - जयंत पाटील

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

Abeer Gulal Serial: श्री पुन्हा अडकणार संकटात, शुभ्राचा कट यशस्वी; 'अबीर गुलाल' मालिकेत नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT