Actress Spoke About Casting Couch: या प्रकारामुळे निश्चितच त्रास होतो... नाळ मधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने कास्टिंग काऊचंवर मांडले मत

Deepti Devi On Casting Couch: दीप्ती देवी कास्टिंग काऊच विषयी तिचे मत मांडले आहे.
Deepti Devi On Casting Couch
Deepti Devi On Casting CouchInstagram @deepti.devi

Famous Marathi Actress Talk About Casting Couch: कास्टिंग काऊच हा विषयी गंभीर आहे. अनेक अभिनेत्री आता यावर बोलताना दिसतात. त्यांची मते मांडताना दिसतात. परंतु आता हा प्रकार फक्त कोणत्या एका क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. सगळ्याच्या क्षेत्रात कास्टिंग काऊचचे प्रकार घडतात. आता यावर मराठी अभिनेत्री दीप्ती देवीने तिचे मत मांडले आहे.

दीप्ती देवी कास्टिंग काऊच विषयी तिचे मत मांडताना म्हटले आहे की, "हे प्रकार सगळीकडेच चालतात. कोणतंच क्षेत्र त्याला अपवाद नाही. काही माणसं याचा ताकद म्हणून उपयोग करतात किंवा एखाद्या गोष्टीसाठीची अट म्हणून वापर करून घेतात. (Latest Entertainment News)

Deepti Devi On Casting Couch
Adipurush Trailer Released: जय श्रीरामचा नारा दाही दिशांना दुमदुमला..! बहुप्रतीक्षित आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

प्रत्येकाचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. जेव्हा हे प्रकार वाढायला लागतात तेव्हा निश्चितच त्याचा त्रास होतो. पण आपल्याकडे कधीही ठामपणे 'नाही' म्हणण्याचा पर्याय असतो. सगळ्यांनी ठरवलं, की हे होऊ द्यायचं नाही, तर या पात्रतेवर कुणी कास्टिंग करणार नाही. इथं नाही म्हणायची ताकद असेल, तर ती वापरायला हवी आणि मुळात असं सगळ्यांना वाटायला हवं."

'मला सासू हवी' या मालिकेतून दीप्ती देवी घराघरात पोचली. दीप्ती मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. दीप्तीने तिच्या कामाने स्वतःची वेगाने ओळख निर्माण केली आहे. मराठीसह दीप्तीने हिंदीमध्ये देखील काम केले आहे.

नाळ, घर बंदूक बिर्याणी या नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच कंडिशन्स अप्लाय; अति लागू, पेज ४, अंतरपाट, परिवार: कर्तव्य कीपरीक्षा, इंदोरी इश्क, अपने अपने रिश्तो की बोली अशा चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com