HBD Adah Sharma
HBD Adah Sharma Saam TV
मनोरंजन बातम्या

Adah Sharma Share Video: 'द केरला स्टोरी' फेम अभिनेत्री लागली देवपूजेला; वाढदिवशी केले शिव तांडव पठण

Pooja Dange

The Kerala Story Fame Actress Celebriting Birthday: अदा शर्माने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अदा मंदिरातील शिवलिंगासमोर बसलेली दिसत आहे. तसेच ती शिव तांडव पठण करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या उर्जेचे रहस्य. ही ऊर्जा जी मला चांगले स्वीकारण्याची आणि बंदींना तोंड देण्याची शक्ती देते. मला तुमचे बनवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.' (Latest Entertainment News)

आज अदा शर्माचा वाढदिवस आहे. कदाचित वाढदिवसानिमित्त देवदर्शन करण्यासाठी अदा गेली आहे. अदाचा जन्म ११ मे, १९९२ रोजी झाला. वयाच्या १६व्या वर्षी अदाने एक हॉरर चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

'द केरला स्टोरी' हा चित्रपट यापूर्वी मध्य प्रदेशात करमुक्त करण्यात आला होता. राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही हा चित्रपट करमुक्त केला होता. उत्तराखंडनंतर आता हरियाणामध्येही चित्रपट करमुक्त झाला आहे.

सुदिप्तो सेन दिग्दर्शित हा चित्रपट 5 मे 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. बुधवारी म्हणजे १० मी रोजी या चित्रपटाने १२ कोटीची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ६८. ८६ कोटी रुपयांची कमाई केली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stone Pelting In Mihir Kotecha Ralley: भाजप उमेदवाराच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; १ महिला जखमी, मुंबईत वातावरण तापलं

International Workers Day: १ मेला 'कामगार दिन' का साजरा करतात? जाणून घ्या

Beed Lok Sabha: बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का; महाविकास आघाडीची ताकद वाढली!

Shirur Loksabha: बारामतीनंतर शिरुरमध्येही अपक्षाच्या हाती 'तुतारी'; अमोल कोल्हेंची वाढणार चिंता?

OLA Layoffs : 'ओला'मधील 10 टक्के कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; CEO बख्शींनी दिला ३ महिन्यात राजीनामा

SCROLL FOR NEXT