The Kerala Story Director File Police Complaint Instagram @sunshinepicturesofficial
मनोरंजन बातम्या

The Kerala Story Controversy: घरातून एकटे बाहेर पडू नका... 'द केरला स्टोरी'च्या क्रू मेंबरला धमकी

The Kerala Story Crew Member Get Threat: 'द केरला स्टोरी' चित्रपटाच्या क्रू सदस्यांपैकी एकाला अज्ञात प्रेक्षकाकडून धमकी मिळाली आहे. .

Pooja Dange

The Kerala Story Director File Police Complaint: 'द केरला स्टोरी' हा चित्रपट ५ मेला प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाला विरोध होत. चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी करण्यात येत आहे. यातच चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी दावा केला आहे की चित्रपटाच्या क्रू सदस्यांपैकी एकाला अज्ञात प्रेक्षकाकडून धमकी मिळाली आहे. .

पोलिसांना माहिती देताना सुदीप्तो सेन म्हणाले की, क्रू मेंबरला मेसेजद्वारे घरातून एकटे बाहेर पडू नका असे सांगण्यात आले होते. ही स्टोरी दाखवून क्रूने चांगले काम केले नाही, असेही या मेसेजमध्ये म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी क्रू मेंबरला सुरक्षा दिली आहे. मात्र, पोलिस ठाण्यात लेखी तक्रार न आल्याने या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. (Latest Entertainment News)

'द केरला स्टोरी'वरून वाद

'द केरळ स्टोरी' मध्ये लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर ISIS च्या कॅम्पमध्ये तस्करी करणाऱ्या तीन महिलांच्या अग्निपरीक्षेचे वर्णन केले आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित, या चित्रपटाला केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी तीव्र विरोध केला, त्यांनी या चित्रपटाला "RSS प्रचार" म्हटले आहे.

'द केरळ स्टोरी'मध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. केरळमधील 32,000 महिला बेपत्ता झाल्या आणि दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील झाल्याचा दावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. निषेधाच्या पार्श्वभूमीवर, ट्रेलरमधील वादग्रस्त कंटेन्ट बदलण्यात आला. त्यानंतर हा चित्रपट केरळमधील तीन महिलांच्या कथेत आधारित करण्यात आला.

'द केरला स्टोरी' टॅक्स फ्री

भाजपशासित मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री)करण्यात आला आहे. "शांतता राखण्यासाठी" आणि "द्वेष आणि हिंसाचार" टाळण्यासाठी पश्चिम बंगाल या चित्रपटावर बंदी घालणारे पहिले राज्य बनले आहे.

'द केरला स्टोरी'वर बंदी

या बंदीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी सांगितले की, ते या निर्णयाविरोधात कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहेत. "जर राज्य सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही, तर आम्ही कायदेशीर मार्ग शोधू. तथापि, आम्ही जो काही मार्ग काढू तो कायदेशीर सल्ल्यावर आधारित असेल," शाह यांनी एएनआयला सांगितले.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

'द केरला स्टोरी' या चित्रपटाला विरोध होत असतानाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन देखील केले आहे. चित्रपटाने रविवारी १६ करोडची कमाई केली आहे. तर चार दिवसात या चित्रपटाने ३५.२५ करोडचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT