Adah Sharma Interview: बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या ‘द केरला स्टोरी’चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आहे. चित्रपटाने भारतात सध्या १३६. ७४ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. नुकतेच तिने एएनआय या वृत्तसंस्थेसोबत संवाद साधला होता. यावेळी तिने अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. सोबतच चित्रपटांविषयी देखील तिने महत्वाचे खुलासे केले.
प्रत्येक चित्रपट करताना मला नेहमी असे वाटायचे की, ‘हा माझा शेवटचा चित्रपट असेल’. आगामी चित्रपटात मला भूमिका मिळेल की नाही, माहित नाही. प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल की नाही, त्यामुळे मी नेहमी प्रत्येक चित्रपट शेवटचा समजते.
पूर्वी अदाला ‘ओम शांती ओम’मधील शाहरुख खान सारख्या पुनर्जन्माची या लाईफमध्ये अशी संधी मिळण्याची गरज आहे का, असा प्रश्न तिला पडला होता. “ ”
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अदा म्हणते, “प्रत्येक चित्रपट करताना मला नेहमी असे वाटायचे की, ‘हा माझा शेवटचा चित्रपट असेल’. आगामी चित्रपटात मला भूमिका मिळेल की नाही, माहित नाही. प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल की नाही, त्यामुळे मी नेहमी प्रत्येक चित्रपट शेवटचा समजायचे. माझ्यासाठी प्रेक्षकांची स्वप्नं नेहमीच मोठी होती. जसे की, प्रेक्षक म्हणायचे, अदाला ही किंवा ती भूमिका द्यायला हवी होती... पण मला वाटतंय, ती सर्व स्वप्नं आता सत्यात उतरत आहेत. माझा अभिनय, माझं काम आणि त्यातील जिद्द मेहनतीला येत आहे. मी खूप भाग्यवान आहे. माझी स्वप्न फारच छोटी होती, माझं एक स्वप्न होतं की, मला हत्ती किंवा कुत्र्यासोबत खेळायचे होते. मला कशा चांगल्या भूमिका मिळतील याची खात्री नव्हती. पण आता अखेर माझ्या भूमिका पाहून, अभिनय पाहून चांगले रोल मिळत आहेत.”
सोबतच आपल्या अभिनयाबद्दल बोलताना अदा शर्मा म्हणते, “एवढंच नाही तर मला सिनेकारकिर्दित चांगली संधी मिळण्यासाठी ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील शाहरुख खानसारखा पुनर्जन्म घ्यावा लागेल का, असा विचार पूर्वी माझ्या मनात अनेकदा हा विचार यायचा. पण अखेर तशी संधी मिळाली आणि मला चांगला प्रोजेक्ट मिळाला. जेव्हा हा चित्रपट करत होते, त्यावेळी वाटत नव्हतं की, प्रेक्षक माझ्या या चित्रपटाचे इतके कौतुक करतील, पण अखेर स्वप्न सत्यात उतरत आहेत.”
मुलाखतीत अदाने चित्रपटाबद्दल देखील अनुभव शेअर केला आहे. त्यावेळी ती म्हणते, “जेव्हा चित्रपटाची शूटिंग सुरू होती, त्यावेळी आम्हाला वाटायचं की, चित्रपटातून अनेक महिलांना सामाजिक संदेश मिळल आणि महिलांमध्ये या विषयी जनजागृती देखील होईल. अखेर आमच्या सर्वांचच स्वप्न पूर्ण होत असून, प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील वास्तविकता सर्वांनाच कळत आहे. कलाकार म्हणून नेहमीच प्रेक्षकांनी आमचं काम पाहावं असं वाटतं, पण यावेळी मिळालेल्या पात्राचा मला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.”
'द केरला स्टोरी'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ८.३ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यातील शनिवारी चित्रपटाने १९.५० कोटींची कमाई केलीय. तर एकट्या रविवारी चित्रपटाने २३.७५ कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे अदा शर्मा स्टारर 'द केरला स्टोरी'ने एकट्या भारतात सध्या १३६.७४ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. 2023 मध्ये आलेल्या 'पठान', 'तू झुठी में मकर', 'किसी का भाई किसी की जान' नंतर 'द केरला स्टोरी' हा १०० कोटींच्या कलेक्शनमध्ये येणारा सलग चौथा चित्रपट ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.