Happy Birthday Vicky Kaushal: ‘कतरिना पेक्षा चांगली कोणी मिळाली तर घटस्फोट?’ पत्रकाराला विकीने दिली सनसणीत उत्तर; जागेवरच विषय संपवला...

नुकतंच ट्रेलर लाँचच्या दरम्यान झालेला किस्सा कमालीचा चर्चेत आहे. यावेळी एका पत्रकाराने विकीला जर तुला कतरिना पेक्षा चांगली कोणी मिळाली तर घटस्फोट घेशील का ?
Jara Hatke Jara Bachke Trailer Launching Event Viral Video
Jara Hatke Jara Bachke Trailer Launching Event Viral VideoInstagram

Jara Hatke Jara Bachke Trailer Launching Event Viral Video: विकी कौशल आणि सारा अली खान प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा काल पहिला पोस्टर प्रदर्शित झाला आणि आज लगेचच ट्रेलर प्रदर्शित झाला. हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार आहे. हलके फुलके विनोद असणाऱ्या या चित्रपटातील दोघांचीही केमिस्ट्री अफलातून आहे. नुकतंच ट्रेलर लाँचच्या दरम्यान झालेला किस्सा कमालीचा चर्चेत आहे. यावेळी एका पत्रकाराने विकीला जर तुला कतरिना पेक्षा चांगली कोणी मिळाली तर घटस्फोट घेशील का ?

Jara Hatke Jara Bachke Trailer Launching Event Viral Video
Happy Birthday Vicky Kaushal: अभिनय क्षेत्रात येण्याआधी विकी परदेशात करायचा ‘हे’ काम, पाहा विकीच्या आयुष्यातील Unknown Facts

हा असा प्रश्न ऐकून फक्त विकी- सारा सह सर्वांच्याच तोंडावर तीन तेरा वाजले होते. पण जरी विकी थोडा घाबरला असला तरी, त्याने या प्रश्नाला तल्लख बुद्धीने उत्तर दिले, विकी पत्रकाराला उत्तर देत म्हणतो, “मला संध्याकाळी माझ्या घरी जायचंय, माझ्याकडून अशा प्रश्नांची उत्तर का मागताय तुम्ही ?, मी असे मोठे निर्णय घेण्यासाठी अजून लहान आहे. का उगाच मला हे प्रश्न विचारताय तुम्ही... माझं आणि कतरिनाचं नातं जन्मोजन्माचं आहे.” असं म्हणत त्याने सर्व प्रश्नांना धुडकावून लावले.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजान आणि ज्योती देशपांडे निर्मित ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाची कथा दोन प्रेमी युगुलांवर आधारित आहे. इंदौरच्या कपिल आणि सौम्याचं कॉलेज मधलं प्रेम आहे. नंतर ही जोडी लग्न करते. लग्नाला जस जसे वर्ष सरत जातात, तसं त्यांच्यातील प्रेम कमी कमी होत जातं आणि भांडणात रुपांतर होतं. नेहमीच भांडण करणारी जोडी एकमेकांकडून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात.

Jara Hatke Jara Bachke Trailer Launching Event Viral Video
'Zara Hatke Zara Bachke' Trailer Released: 'जरा हटके जरा बचके' चित्रपटाचा ट्रेलर आऊट: कॉमेडी, ड्रामा, रोमान्ससह पाहायला मिळणार डान्सचा तडका

पण जरी थोडी सिरियस स्टोरी असली तरी, ट्रेलर पाहताना आपल्याला हसू आवरत नाही. कॉमेडी आणि फॅमिली असणारा चित्रपट पाहताना धम्माल मस्ती येणार हे नक्की. ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येणार असून यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्सुक आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com