'Zara Hatke Zara Bachke' Trailer Released: 'जरा हटके जरा बचके' चित्रपटाचा ट्रेलर आऊट: कॉमेडी, ड्रामा, रोमान्ससह पाहायला मिळणार डान्सचा तडका

'Zara Hatke Zara Bachke' Trailer Out: 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट 02 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Zara Hatke Zara Bachke Trailer Out
Zara Hatke Zara Bachke Trailer OutInstagram

Vicky Kaushal-Sara Ali Khan Movie Trailer Out: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान सध्या 'जरा हटके जरा बचके' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानच्या त्यांचा एक मुलाखत देखील व्हायरल होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये विकी आणि सारा दोघांचाही दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.

'जरा हटके जरा बचके' हा विकी कौशल आणि सारा अली खान यांचा एकत्रित पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 'जवान' या चित्रपटामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित होऊ शकली नसल्याची चर्चा यापूर्वी होती. पण आता रिलीज डेट लॉक झाली आहे. 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट 02 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी शाहरुख खानचा 'जवान'ही रिलीज होणार होता. (Latest Entertainment News)

Zara Hatke Zara Bachke Trailer Out
Ali Fazal Attends 'Fast X' Premiere: 'मिर्झापूर'च्या गुड्डूची 'Fast X'च्या मेगा प्रीमियरमध्ये हजेरी; व्हिडिओ शेअर करत केली महत्त्वाची घोषणा

'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे, तर दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा इंदूरच्या एका जोडप्यावर आधारित आहे. कपिल आणि सौम्याची यांच्यावर अवतीभोवती ही कथा फिरते. कपिल-सौम्या त्यांच्या कॉलेजच्या दिवसात प्रेमात पडले होते. घरच्यांच्या संमतीने त्यांचा विवाह झाला.

लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांच्यात खूप प्रेम असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. पण काळाच्या ओघात त्यांचा रोमान्सही ओसरतो. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेले कपिल आणि सौम्या यांना आता एकमेकांचे तोंडही पाहणे आवडत नाही आणि घटस्फोट घेऊन वेगळे जीवन जगायचे आहे. या चित्रपटाचा सर्वात ठळक मुद्दा म्हणजे कपिल आणि सौम्याचा घटस्फोट केवळ या दोघांमध्ये होणार नसून तो संपूर्ण कुटुंब असेल.

या चित्रपटामध्ये कॉमेडी, ड्रामा, रोमान्स असं सर्वच पाहायला मिळणार आहे. विकी आणि साराच्या डान्स तडका देखील या चित्रपटामध्ये असणार आहे. तर इंदोरची सफर देखील आपल्याला या चित्रपटातून घडणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरला आणि विकी कौशल-सारा अली खानच्या जोडीला चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने इंस्टाग्रामवर लिहिले की, "विकी कौशल आणि सारा अली खानची नवीन जोडी आमच्या हृदयावर राज्य करणार आहे." त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com