The Kerala Story 1st Day Box Office Collection: Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Kerala Story 1st Day Collection: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'द केरळ स्टोरी'ची दमदार ओपनिंग; ट्रोलिंगमुळे झाला फायदा

The Kerala Story Opening Day Collection: 'द केरळ स्टोरी' 2023 च्या टॉप ओपनिंग चित्रपटांच्या यादीत पाचव्या स्थानावर.

Pooja Dange

The Kerala Story 1st Day Box Office Collection: 'द केरळ स्टोरी' चित्रपट काल मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाचे शो काही ठिकाणी बंद पाडण्यात आले होते. पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने निर्मात्यांचे टेन्शन नक्कीच वाढले असणार. वाद आणि विरोध होत असताना देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट २०२३ सालच्या टॉप ५ ओपनिंग लिस्ट मध्ये सामील झाला आहे.

सुदीप्तो सेन यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच देशात खळबळ उडाली होती. हा चित्रपट ५ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग केली आहे. या चित्रपटाच्या कलेक्शनने शेहजादा आणि द काश्मीर फाइल्स सारख्या चित्रपटांना मागे टाकले.

केवळ 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने मोठ्या व्यावसायिक चित्रपटांना मागे टाकले आहे. केरळ स्टोरी 2023 मधील पाचव्या सर्वात मोठ्या ओपनिंग करणार चित्रपट ठरला आहे.

एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे तर दुसरीकडे चित्रपट ट्रोल झाल्यामुळे त्याच्याही फायदा मिळत आहे. केरळ स्टोरीला प्रेक्षकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे बघितले तर चित्रपटाने सिंगल डिजिटमध्ये कमाई केली आहे. सकनिल्‍कच्‍या अहवालावर आधारित 'द केरळ स्टोरी'ने पहिल्याच दिवशी 7.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. हे सुरुवातीच्या ट्रेंडचे आकडे आहेत. अधिकृत आकडे यापेक्षाही जास्त असू शकतात. (Latest Entertainment News)

अशा प्रकारे, 'द केरळ स्टोरी' 2023 च्या टॉप ओपनिंग चित्रपटांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. माऊथ पब्लिसिटीचा फायदाही चित्रपटाला झाला आहे. या यादीत शाहरुख खानचा चित्रपट टॉपवर आहे.

पठानने पहिल्या दिवशी 57 कोटींची कमाई केली. सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 15.81 कोटी कमाईसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तू झुठी मैं मक्कर 15.73 कोटींसह तिसर्‍या क्रमांकावर आणि अजय देवगणचा भोला 11.20 कोटींसह चौथ्या क्रमांकावर आहे.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात 3 महिलांची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना इस्लामिक धर्म स्वीकारण्यास भाग पडले जाते आणि त्यांचा ISIS या दहशतवादी संघटनेत समावेश केला जातो. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात अडकला होता. अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT