The first song of Brahmastra movie Kesaria has been launched Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kesariya Song Out: रणबीर-आलियाची रोमँटिक केमिस्ट्री पहिलीत का?

'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे पहिले गाणे 'केसरिया' लाँच झाले आहे. गाण्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि पटाखा गुड्डी आलिया भट्ट(Alia Bhatt) त्यांच्या आगामी सिनेमा 'ब्रह्मास्त्र'मुळे तुफान चर्चेत आहेत. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'केसरिया' हे पहिलं गाणं लाँच करण्यात आलं आहे. या गाण्यात आलिया आणि रणबीरची उत्तम केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. गाण्यात आलिया आणि रणबीर वाराणसीच्या रस्त्यांवर रोमान्स करताना दिसत आहेत. फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव या दोघांवर होताना दिसतो. या गाण्यात आलिया आणि रणबीरचे अनेक मेलॅडी रोमँटिक सिन दाखवण्यात आले आहेत.

'ब्रह्मास्त्र'मधील 'केसरिया' हे गाणे अरिजित सिंगने अतिशय सुंदर पद्धतीने गायले आहे. याचे सुरेख संगीत प्रीतम यांनी दिले असून त्याचे गीत प्रसिद्ध गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. जे थेट लोकांच्या हृदयात घर करत. काही मिनिटांतच या गाण्याला यूट्यूबवर ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

आलिया भट्टने या गाण्याचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत 'आमच्या प्रेमाचा आवाज आता तुम्हीही ऐकू शकता 'केसरिया' गाणं प्रदर्शित'. असे आलियाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

आलिया भट्टने तिच्या सोशल मीडियावर 'केसरिया' हे गाणं पोस्ट केल्यापासून तिचे चाहते कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका युजर्रने 'तुम्ही किती क्यूट कपल आहात'. असे लिहून त्यांची प्रशंसा केली तर आणखी एका युजर्रने 'तुमची ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन केमेस्ट्री आम्हाला खूप आवडते'. असे लिहून त्यांना आणखी प्रोत्साहन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सदाभाऊ खोत यांनी केले बाळराजे पाटलांचे समर्थन

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News: सूचना एक कानानं ऐकली दुसऱ्या कानाने सोडली; आगार प्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

Maharashtra Politics: 2 डिसेंबरपूर्वीच राजकीय भूकंपाचा ट्रेलर! शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर|VIDEO

SCROLL FOR NEXT