Better half chi love story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Better half chi love story: सोनू निगमच्या सुरेल आवाजाची जादू; 'बेटर-हाफची लव्हस्टोरी' मधील 'तूच आहे' हे हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित

Better half chi love story: ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटातील ‘तूच आहे’ हे भावस्पर्शी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सुबोध भावेवर चित्रित करण्यात आले आहे.

Shruti Vilas Kadam

Better half chi love story: सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटातील ‘तूच आहे’ हे भावस्पर्शी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांकडून या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या मधुर आणि हृदयाला भिडणाऱ्या आवाजात सादर झालेल्या या गाण्याने अल्पावधीतच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

या गीतात प्रेम, विरह आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. गाण्याचे भावपूर्ण बोल गीतकार संजय अमर यांनी लिहिले असून, ते थेट मनाच्या खोलवर जाऊन भिडतात. तर या गाण्याला साजन पटेल आणि अमेय नरे यांचे संगीत लाभले आहे. हे गाणे सुबोध भावेवर चित्रित करण्यात आले असून, त्यांच्या हृदयस्पर्शी अभिनयाने गाण्याची ताकद अधिकच वाढली आहे.

दिग्दर्शक संजय अमर म्हणतात, '' ‘तूच आहे’ हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी जाणवलेली वेदना, ओढ आणि एकटेपणाचा भावनिक प्रवास उलगडणारे गाणे आहे. सुबोध भावे यांचा अभिनय आणि सोनू निगम यांचा आवाज ही या गाण्याची खरी बाजू आहे.

बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केले आहे. रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटात सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळतील. विनोद आणि प्रेमाचा अद्वितीय मेळ असलेल्या या सिनेमाचा टिझर आधीच चर्चेत आला होता आणि आता ‘तूच आहे’ गाण्यानेही प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. हा चित्रपट २२ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: दरमहा मिळतात १५०० रुपये, सरकारच्या योजनेवरच लाडक्या बहिणी रुसल्या | VIDEO

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील प्रताप चौकात दारूड्यांचा राडा

Maharashtra Tourism: महाराष्ट्रात फिरण्याचा प्लान करताय, मग 'या' सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या

Tech News: सावधान! ऑफिसच्या लॅपटॉपवर WhatsApp Web चालवणं आहे घातक, काय आहे धोका?

Pune: पुण्यात भररस्त्यात ट्रॅफिक पोलिस आणि कॅब चालकाचा राडा, शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT