The Archies Trailer Instagram
मनोरंजन बातम्या

The Archies Trailer: ‘द आर्चिज’मध्ये स्टारकिड्सचा रेट्रो लूक; मैत्री, प्रेम, ब्रेकअप अन् धमाल मस्तीने वेधले चाहत्यांचे लक्ष

The Archies: झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चिज’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Chetan Bodke

The Archies Trailer Released

सोशल मीडियावर झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चिज’ स्टारकिड्समुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. एकाच चित्रपटातून तब्बल तीन स्टार किड्स बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा हे तिघेही स्टारकिड्स एकाच चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर करणार आहेत. (Bollywood)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चित्रपटाचा टीझर किंवा ट्रेलर जर आपण पाहिला तर, चित्रपटाची कथा १९५०- १९६०मधील असल्याचे दिसत आहे. ट्रेलर पाहताच आपल्याला १९५०- ६०च्या दशकातील आठवण करुन देते. या भव्य दिव्य ट्रेलरमध्ये कलाकाराचा लूक आणि त्यांच्या स्पेशल हेअरस्टाईलने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ट्रेलरमध्ये सुहाना, खुशी आणि अगस्त्य यांच्यासह आणखी काही कलाकारही आपल्याला दिसत आहेत. सर्वांच्याच अभिनयाने चाहत्यांचे मने जिंकले असली तरी, अगस्त्य नंदाच्या अभिनयाने चित्रपटाला चार चाँद लावले आहे. (Bollywood Film)

झोया अख्तर दिग्दर्शित चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना मैत्री, प्रेम, ब्रेकअप, धमाल मस्ती आणि काही भावनिक क्षण दिसून येत आहे. चित्रपटाचे म्युझिकही प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घेणारे आहे. चित्रपटाचा ट्रेलर नेटफ्लिक्स इंडियाने शेअर केला असून अवघ्या काही तासांतच चित्रपटाच्या ट्रेलरला काही मिलियन्स व्ह्यूज मिळाले आहेत. ‘द आर्चिज’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून येत्या ७ डिसेंबरला ओटीटीवर रिलीज होणार आहे. (Social Media)

चित्रपटामध्ये अगस्त्य नंदा, सुहाना खान, खुशी कपूर, मिहिर आहुजा, अदिती सेहगल, रेगी मेंटल, वेदांग रैना, डॉट आणि युवराज मेंडा हे कलाकार देखील दिसणार आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांची तब्बेत बिघडली, वृंदावनमधील पदयात्रा रद्द

Govinda : गोविंदाच्या इव्हेंटमध्ये राडा! बाउन्सरने धक्काबुक्की केल्याने वाद चिघळला, VIDEO व्हायरल

Chole Bharture Recipe: स्ट्रीट स्टाईल चमचमीत छोले भटुरे बनवायचेत; फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप रेसिपी

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT