Jui Gadkari Solo Trip Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jui Gadkari: थायलंडमध्ये मध्यरात्री हरवली प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री; सोलो ट्रिपमधील धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली...

Jui Gadkari Solo Trip: अभिनेत्री जुई गडकरीने सोलो ट्रिपदरम्यान थायलंडमध्ये मध्यरात्री हरवल्याचा अनुभव सांगितला. शांत राहून आणि फोनमधील फोटोंच्या मदतीने तिने हॉटेलचा रस्ता शोधत सुरक्षितपणे परतल्याचे तिने उघड केले.

Shruti Vilas Kadam

Jui Gadkari Solo Trip: ठरलं तर मग फेम अभिनेत्री जुई गडकरी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. अभिनयासोबत प्रवास करायलाही तिला विशेष आवडत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुईने तिच्या सोलो ट्रॅव्हलिंगच्या अनुभवांबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी तिने थायलंडमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय सोलो ट्रिपदरम्यान घडलेला एक धक्कादायक आणि भीतीदायक प्रसंगही सांगितला.

जुईने सांगितले की, लहानपणापासूनच मला आई-वडिलांमुळे मला प्रवासाची आणि नवीन ठिकाणे पाहण्याची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या संस्कृती, निसर्ग आणि नवीन अनुभव जाणून घेणे मला नेहमीच आवडते. त्यामुळेच स्वतःच्या कमाईतून मी पहिली परदेशवारी थायलंडला केली होती.

या प्रवासादरम्यान घडलेली घटना आठवत जुई म्हणाली की, मी एका ग्रुपसोबत फिरत होती. मात्र, मध्यरात्री साधारण अडीचच्या सुमारास मी त्या ग्रुपपासून वेगळी झाली आणि अनोळखी भागात हरवली. तो परिसर सुरक्षित वाटत नव्हता. आजूबाजूला सुरू असलेल्या काही विचित्र हालचाली पाहून मी घाबरले होते. अशा वेळी अनेकजण गोंधळून जातात, पण मी शांत राहण्याचा निर्णय घेतला.

जुईने सांगितले की, मला एक सवय आहे. मी जिथेही प्रवासाला जाते, तिथल्या रस्त्यांचे, महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि ओळख पटेल अशा जागांचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवते. त्याच सवयीचा मला त्या रात्री मोठा फायदा झाला. फोनमधील फोटोल पाहत आणि रस्ते ओळखत मी हळूहळू हॉटेलचा मार्ग शोधला. साधारण तीनच्या सुमारास मी सुरक्षितपणे हॉटेलमध्ये परतली.

हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तिच्यासोबत असलेल्या ग्रुपमधील सदस्यांना तिची चिंता वाटत असल्याचे तिला समजले. मात्र, ती सुरक्षित परतल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या अनुभवातून तिला मोठा धडा मिळाल्याचेही जुईने सांगितले. "अशा प्रसंगी घाबरण्याऐवजी शांत राहून विचार केला, तर मार्ग नक्की सापडतो," असे ती म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SIR: इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान ४२ निवृत्त न्यायाधीशांचे SIR ला समर्थन, थेट देशाच्या नावाने लिहिलं खुलं पत्र

Nana Patekar Death: 'त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही...'; नाना पाटेकरांच्या निधनाने जान्हवी किल्लेकर भावुक

90,000 पगार, तरी BMW, Volvo, 2 Mercedes कुठून आले? 3 तासांच्या सुनावणीत न्यायमूर्तींचे सचिन वाझेंना धडाधड प्रश्न; जामिनावर काय निर्णय दिला?

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या सूचना; एस. एम. जोशी पूल रिकामा करण्याचे आवाहन

Hotel Rooms Safety Tips: हॉटेलच्या रूममध्ये कुठे असतात छुपे कॅमेरे? बुकिंग करण्यापूर्वी तपासा या 4 महत्त्वाच्या जागा

SCROLL FOR NEXT