Tharala Tar Mag Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट! सायलीला बदनाम करण्यासाठी सचिन-प्रियाची नवी खेळी

Tharala Tar Mag :'ठरलं तर मग'च्या नव्या भागात सचिन आणि प्रिया मुलींच्या तस्करीचा कट रचतात. आश्रमाची जबाबदारी स्वीकारलेल्या सायलीवर मोठं संकट ओढावण्याची शक्यता निर्माण होते.

Shruti Vilas Kadam

Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मराठी मालिकेच्या १६ जुलै २०२६ रोजीच्या भागात प्रेक्षकांना अनेक धक्कादायक घडामोडी पाहायला मिळाल्या. एका बाजूला सायलीने वात्सल्य आश्रमाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे सर्वांना दिलासा मिळतो, तर दुसरीकडे सचिन आणि प्रिया एक भयानक कट रचत आहेत.

मधुभाऊंची प्रकृती खालावल्यामुळे आश्रमाची जबाबदारी आता सायली सांभाळणार असल्याचे ती घरच्यांना सांगते. तिच्या या निर्णयामुळे घरातील सर्वजण आनंदी असले तरी कल्पनाला तिच्या गरोदरपणाची चिंता वाटते. मात्र, काम घरूनच करणार असल्याचे सांगत सायली तिची समजूत काढते.

दरम्यान, आश्रमात खर्चाचा हिशेब पाहताना सायलीला आर्थिक गैरव्यवहाराची जाणीव होते. यावर अर्जुन आश्रमाला एनजीओमध्ये रूपांतरित करण्याचा सल्ला देतो. त्यामुळे आश्रमाचा कारभार अधिक पारदर्शक होईल, असा विश्वास दोघांनाही वाटतो. दुसरीकडे, महिपतला अधिक पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून सचिन मुलींच्या तस्करीची आयडिया देतो. सुरुवातीला पोलिसांची भीती वाटल्याने महिपत ही आयडिया नकारतो. मात्र, मोठ्या पैशांच्या मोहापुढे तो अखेर तयार होतो. सचिन त्याला खात्री देतो की या संपूर्ण कारस्थानात त्याचे नाव कुठेही समोर येणार नाही.

याचवेळी राकेशकडून प्रियाला समजते की सायली आता आश्रमाची जबाबदारी स्वीकारणार आहे. ही माहिती मिळताच प्रिया सचिनला धक्कादायक योजना सुचवते. मोठ्या घरातील मुलींऐवजी आश्रमातील निराधार मुलींना टार्गेट करण्याचा सल्ला ती देते. यामुळे मुली बेपत्ता झाल्यानंतर संपूर्ण दोष सायली आणि अर्जुनवर जाईल, असा तिचा डाव असतो. प्रियाची ही योजना ऐकून सचिनही तिचे कौतुक करतो.

आता सायली त्या मुलींचा जीव वाचवेल का? सचिन आणि प्रियाचा मुलींच्या तस्करीचा कट उघडकीस येईल का? की या संपूर्ण प्रकरणात सायली आणि अर्जुन नाहक अडकतील? याची उत्सुकता पुढील भागात शिगेला पोहोचणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

Maharashtra News Live Update: सोमेश्वर साखर कारखान्याच्या विजयी उमेदवारांचे अजितदादांना अभिवादन; जय पवारांची उपस्थिती

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

SCROLL FOR NEXT