Jui Gadkari Receive Threat From Instagram User Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jui Gadkari Received Threat : '... नाही तर तुला जेलमध्ये टाकेन'; जुई गडकरीला तरूणीने का दिली धमकी ?

Jui Gadkari Received Threat : सध्या जुई गडकरी एका कारणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्रीला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका युजरकडून धमकी मिळाली आहे.

Chetan Bodke

Jui Gadkari Receive Threat From Instagram User

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरी सध्या आपल्या अभिनयाच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. यापूर्वी अभिनेत्रीला अनेक टेलिव्हिजन सिरीयलमधून आणि 'बिग बॉस मराठी' या रिॲलिटी शोमधून तिला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे अभिनेत्रीचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. सध्या जुई गडकरी एका कारणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्रीला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका युजरकडून धमकी मिळाली आहे.

अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच एक स्टोरी शेअर केलेली आहे. त्यामध्ये तिला एका युजरकडून धमकी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. जुईला मिळालेल्या धमकीची तिने इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे.

संबंधित युजरने असे लिहिलंय की, "काय गं तुला माज आलाय का, आम्ही तुला फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झालं? कळत नाही का? आताच्या आता आम्हाला फॉलो करायचं, सपना पांचाळ, राखी सुतार, करुणा विन्हेरकर, यश विन्हेरकर यांना... तू फॉलो कर नाहीतर तुला जेलमध्ये टाकेन. आजपर्यंत तू आमची आवडती हिरॉइन होतीस. कारण आम्हाला वाटायचं की तू फॉलो करशील आम्हाला, पण नाही... आणि म्हणून मी तुला पोलिसात टाकेन. उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला समजलं. कुठेही पळायचं नाही, ओके बाय." (Social Media)

Jui Gadkari Receive Threat From Instagram User

अभिनेत्रीने त्या युजरला इन्स्टा स्टोरीवर प्रत्युत्तरही दिलेलं आहे. जुई गडकरी तिला प्रत्युत्तर देताना म्हटली की, "अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, आधीच सांगते. थेट पोलीस स्टेशनलाच भेटू मग आपण.... @rakhee_sutar झालीस तू फेमस, येच कर्जतला, बघतेच मी पण!" असं खणखणीत उत्तर देत जुईने त्या युजरची बोलतीच बंद केली आहे. (Marathi Actress)

जुई गडकरीच्या कामाबद्दल सांगायचे तर, 'पुढचं पाऊल' या मालिकेतून अभिनेत्रीला महाराष्ट्रातल्या घराघरांत लोकप्रियता मिळाली आहे. त्यासोबतच ती 'बिग बॉस मराठी' या रिॲलिटी शोमध्येही दिसली होती. सध्या जुई स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT