Box Office Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Box Office Collection : 'थामा' की 'एक दीवाने की दीवानियत' वीकेंडला कोणता चित्रपट हाऊसफुल? वाचा कलेक्शन

Thamma vs Ek Deewane ki Deewaniyat Collection : पहिल्या वीकेंडला 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपटांनी किती कमाई केली जाणून घेऊयात. 'थामा'च्या कमाईत वाढ झाली आहे.

Shreya Maskar

'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियत' दोन्ही चित्रपट 21 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत.

वीकेंडला 'थामा'ने बक्कळ कमाई केली आहे.

'एक दीवाने की दीवानियत' हा म्युजिकल रोमँटिक ड्रामा आहे.

रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) 'थामा' (Thamma) आणि हर्षवर्धन राणेचा (Harshvardhan Rane) 'एक दीवाने की दीवानियत' (Ek Deewane ki Deewaniyat) चित्रपट 21 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. वीकेंडला कोणी किती कमावले जाणून घेऊयात. 'थामा' हॉरर-कॉमेडी-लव्ह स्टोरी आहे. तर 'एक दीवाने की दीवानियत' हा म्युजिकल रोमँटिक ड्रामा आहे.

'थामा' चित्रपटात रश्मिका मंदाना, आयुष्मान खुरानासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी सप्तमी गौड़ा, डायना पेंटी, वरुण धवन, संजय दत्त, अपारशक्ती खुराणा असे अनेक कलाकार आहेत. 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपटातून 'सनम तेरी कसम' फेम हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री सोनम बाजवा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

'थामा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5

'थामा' चित्रपटाने सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पाचव्या दिवशी म्हणजे शनिवारी 13 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 78.60 कोटी रुपये झाले आहे. चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

  • दिवस पहिला- 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा- 18.6 कोटी रुपये

  • दिवस तिसरा- 13 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 10 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 13 कोटी रुपये

  • एकूण - 78.60 कोटी रुपये

'एक दिवाने की दिवानियत' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाने सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पाचव्या दिवशी म्हणजे शनिवारी 5.75 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 34 कोटी रुपये झाले आहे.

  • दिवस पहिला- 9 कोटी रुपये

  • दिवस दुसरा- 7.5 कोटी रुपये

  • दिवस तिसरा- 6 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 5.5 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 5.75 कोटी रुपये

  • एकूण - 34 कोटी रुपये

ओटीटी रिलीज

थामा : थिएटर गाजवल्यानंतर 'थामा' चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'थामा' चित्रपट प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मात्र अद्याप ओटीटी रिलीजची डेट जाहीर करण्यात आली नसून रिपोर्टनुसार, चित्रपट थिएटर रिलीजनंतर सहा ते आठ आठवड्यांच्या आत ओटीटीवर येईल. म्हणजेच डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या आसपास चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळेल.

एक दीवाने की दीवानियत : मीडिया रिपोर्टनुसार, 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपट थिएटर गाजवल्यानंतर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मात्र अद्याप रिलीज डेट जाहीर झाली नाही. 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपट थिएटर रिलीजनंतर ६० दिवसांत ओटीटीवर पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge : जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान, 336 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या किंमत

WhatsApp मध्ये मोठा बदल, आई-वडिलांकडे राहणार तुमच्या प्रत्येक चॅटची माहिती; कसं ते वाचा

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असेल 'ही' अनमोल गोष्ट, त्याला पृथ्वीवरच स्वर्ग मिळेल

Goregaon Mulund Link Road: मुंबई-ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम सुरु; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT