Thama Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Thama: खूनी प्रेम कहानी...; आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा थरार, रश्मिका मंदानाचा ग्लॅमर, 'थामा'चा जबरदस्त टिझर प्रदर्शित

Thama Teaser: 'थामा' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात व्हँपायरची भूमिका करणारा आयुष्मान खुराना आणि खलनायकाची भूमिका करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी एका भयानक अवतारात दिसत आहे.

Shruti Vilas Kadam

Thama Teaser: मॅडॉक फिल्म्सने त्यांच्या बहुप्रतिक्षित 'थामा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे, या टिझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा अवतार खूपच भयावह आहे. विशेष म्हणजे 'थामा' मध्ये भयपटांसोबतच एक रक्तरंजित प्रेमकथा आणि एका व्हॅम्पायर स्टोरी पाहायला मिळणार आहे.

मॅडॉक फिल्म्सने आतापर्यंत 'स्त्री', 'स्त्री २', 'भेडिया' आणि 'मुंज्या' यासारख्या हॉरर कॉमेडी बनवल्या आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये प्रेमकथेचा थोडासा अँगल दाखवण्यात आला होता, परंतु 'थामा' ही या बॅनरची पहिली प्रेमकथा आहे.

'थामा' च्या टीझरमध्ये...

'थामा' चा टीझर आयुष्मान खुराणाचे पात्र आलोकच्या आवाजाने सुरू होतो. तो तारकाला म्हणजेच रश्मिका मंदानाला विचारतो, तू माझ्याशिवाय १०० वर्षे जगू शकशील का? ती उत्तर देते १०० वर्षे काय, एका क्षणासाठीही नाही. आणि मग रश्मिका मंदाना एका भयानक लूकमध्ये दिसते.

'थामा' हा चित्रपट २०२५ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. आदित्य सरपोतदार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 'थामा'ची कथा 'स्त्री' आणि 'भेडिया'शी जोडलेली असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरत प्रदर्शित होणार असून या चित्रपटात आयुष्मान खुराणा, रश्मिका मंदानाशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी, परेश रावल आणि प्रह्लाद चा महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सकाळी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळा 'हा' एक घटक; लिव्हरची चरबी पटकन वितळेल

यात्रीगण कृपया ध्यान दे! देशभरात एअर इंडियाचं सर्व्हर डाउन; दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Maharashtra Politics : काँग्रेस आणि ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का; ३ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Ind vs SA: भारतीय कसोटी संघाची घोषणा, दुसरं मोठं संकट परतवून लावणाऱ्या धाकड क्रिकेटपटूची एन्ट्री, दोघांना बाहेरचा रस्ता

SCROLL FOR NEXT