Thalapathy Vijay Falls Down Saam tv
मनोरंजन बातम्या

Thalapathy Vijay: 'काही लोक माझ्याविरोधात कट रचत...'; डिव्होर्सवरुन सुपरस्टार थलपथी विजय यांचा भर सभेत गंभीर आरोप

Thalapathy Vijay: थलपथी विजय यांनी अलीकडेच तामिळनाडूमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी 'जना नायकन'च्या प्रदर्शनावरून निर्माण झालेला वाद आणि त्यांच्या घटस्फोटावर भाष्य केले.

Shruti Vilas Kadam

Thalapathy Vijay: तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपथी विजय सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील मोठ्या संकटांचा सामना करत आहेत. एकीकडे त्यांचा बहुचर्चित चित्रपट ‘जना नायकन’ सेन्सॉरशिपच्या अडचणींमुळे रखडला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही मोठी खळबळ उडाली आहे.

विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोरनालिंगम यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. लग्नाच्या तब्बल २७ वर्षांनंतर संगीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून त्यांनी विजयवर विवाहबाह्य संबंध आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी पतीच्या चेन्नईतील घरात राहण्याची परवानगीही मागितली आहे.

या सर्व घडामोडींवर विजय यांनी नुकत्याच झालेल्या सभेत प्रतिक्रिया दिली. त्यांनी या सर्व प्रकरणांमागे राजकीय विरोधकांचा हात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर त्यांची बदनामी करण्यासाठी मुद्दाम या अफवा पसरवण्यात आल्या. 'काही लोक माझ्याविरोधात कट रचत आहेत. त्यांनी अनेक वर्षे वाट पाहून ही अफवा पसरवली, मात्र जनतेवर त्याचा काही परिणाम झाला नाही.' असे विजय यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विजय यांच्या ‘तमिळगा वेटी कळघम’ (TVK) या पक्षाच्या माध्यमातून ते निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. नेल्लाई आणि तिरुनेलवेली येथील सभांमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 'लोकांपासून मला दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण ते शक्य होणार नाही.' असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

दुसरीकडे, ‘जना नायकन’ या चित्रपटावरूनही वाद निर्माण झाला आहे. हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डाने काही सीनवर आक्षेप घेतल्याने प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले असून चित्रपटाचे कधी प्रदर्शित होणार हे अद्याप अनिश्चित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भरधाव कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली; एकाच कुंटुबातील ४ जणांचा मृत्यू

Police Officer Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ३४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

SRPF भरती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; पेपर फुटीचा मुख्य आरोपी आला समोर

Accident: पालघरमध्ये अपघाताचा थरार, २ दुचाकींची समोरासमोर धडक; २ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर

Bribe Case: मुंबईतील ज्युनियर कॉलेजच्या मंजुरीसाठी मागितली दीड लाखांची लाच; लिपिकाला ठोकल्या बेड्या, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT