Highest Paid Actor Of India Instagram
मनोरंजन बातम्या

Highest Paid Actor Of India: सलमान- शाहरूखही पडले मागे; सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत साऊथ अभिनेत्याची बाजी

Vijay Thalapathy Fees: सर्वाधिक मानधन घेणाऱ्या घेणाऱ्या यादीत बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीत तर एका टॉलिवूड सुपरस्टारने सर्वाधिक मानधन घेण्याचा किताब पटकावला आहे.

Chetan Bodke

Highest Paid Celebrity In India: बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारे अभिनेते म्हणजे, सलमान खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार. या अभिनेत्यांचे नेहमीच सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत यांचा नेहमीच समावेश होतो. मात्र सध्या सर्वाधिक मानधन घेणारे बॉलिवूडमधील सेलिब्रिटी नाहीत. टॉलिवूड सुपरस्टारने भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या एका अभिनेत्याचा किताब पटकावला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय सिनेसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्याचा किताब अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून थलपती विजय आहे. विजय आपल्या एका चित्रपटासाठी २०० कोटी रुपये इतके मानधन आकारतो. मात्र, याआधी तो एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपये इतके मानधन आकारतो. पण जसजशी त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली, लोकप्रियतेत वाढ झाली असून त्याच्या फीमध्ये देखील भरमसाठ वाढ झालीय.

विजय सध्या त्याच्या आगामी चित्रपटांवर काम करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयने बहुचर्चित ‘थलपती ६८’ साठी २०० कोटी रुपये इतके मानधन आकारले. महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत कोणत्याच भारतीय कलाकाराने आपल्या कोणत्याच चित्रपटाकरिता इतकी भरमसाठ फी आकारली नव्हती. इतकी फी आकारणारा विजय थलपती हा पहिला भारतीय कलाकार ठरला आहे.

विजयचा हा ६८ वा चित्रपट असल्याने या चित्रपटाचे नाव ‘थलपती ६८’ असे नाव ठेवण्यात आले आहे. अभिनयात माहिर ठरलेला विजय थलपती लवकरच राजकारणातही एन्ट्री करणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. लवकरच तो राजकारणात एन्ट्री करणार असल्याने ‘थलपती ६८’ हा विजयचा अखेरचा चित्रपट असू शकतो.

लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘लिओ’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील आतापर्यंत काही गाणे देखील प्रदर्शित झाले आहेत. चित्रपटातील ‘ना रेडी’ या गाण्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे. चेन्नईच्या कोरुक्कुपेट येथील सामाजिक कार्यकर्त्या सेल्वम यांनी विजयच्या ‘ना रेडी’ गाण्यावर अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेचे समर्थन केल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: बाईक की टेम्पो! दुचाकीवरून ८ जणांचा प्रवास, पोलिसांनी जोडले हात, व्हिडीओ पाहून हैराण व्हाल!

PM Awas Yojana: PM आवाससाठी आता पोर्टलवरून अर्ज! १.८० लाखांची सबसिडी मिळणार, प्रक्रिया आणि कार्यप्रणाली कशी आहे?

Ajit Pawar : ताईंना CM करण्यासाठी अजित पवारांना बदनाम केलं, फडणवीसांचा आरोप, सुप्रिया सुळेंचा पलटवार

Shani Margi 2024: शनीच्या मार्गी चालीने अडचणी वाढणार; 'या' राशींवर राहणार शनिदेवाचं सावट!

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

SCROLL FOR NEXT