Naresh And Pavitra Lokesh Wedding Video: अभिनेता महेश बाबूचा सावत्र भाऊ नरेश यांनी वयाच्या ६३ व्य वर्षी लग्न केले आहे. अभिनेता नरेश यांनी 10 मार्च 2023 रोजी पवित्रा लोकेशशी लग्न केले. दोघेही एकमेकांना काही काळ डेट करत होते. आता दोघांनाही कोणालाही कळू न देता लग्न केले. या विवाह सोहळ्याला नरेशच्या जवळच्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. नरेश त्यांच्या चौथ्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत.
ज्येष्ठ तेलुगू चित्रपट अभिनेते नरेश यांच्या अनेक चित्रपटनमध्ये सहकलाकार असलेल्या पवित्रा लोकेशसोबत लग्न केले आहे. सुमारे दोन वर्षे एकत्र राहिल्यानंतर या जोडप्याने अलीकडेच त्यांच्या नात्याला औपचारिकता दिली.
शुक्रवारी नवविवाहित जोडप्याने पारंपारिक पद्धतीने पार पडलेल्या त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत, जोडप्याने लिहिले आहे की, "आमच्या या नवीन प्रवासात आयुष्यभर शांती आणि आनंदासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत."
नरेश बाबूने त्यांच्या ट्विटरवर त्यांच्या विवाह सोहळ्याचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे आणि नरेश आणि पवित्रा यांच्या खासगी आणि गुप्त लग्नाची झलक पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. लग्नाचे विधी पार पाडताना हे जोडपे एका सुंदर सजवलेल्या मंडपात दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये, पवित्रा आणि नरेश त्यांच्या लग्नात आलेले पाहुणे आशीर्वाद देत असताना स्मितहास्य करत आहेत. नवरदेव पांढऱ्या कुर्ता आणि वेष्टीमध्ये आहे, तर वधू पारंपारिक पेहरावात अतिशय सुंदर दिसत आहे.
पवित्राने लाल रंगाची दक्षिण-भारतीय साडी निवडली जी तिने भारी पारंपारिक दागिन्यांसह जोडली. वेणीच्या हेअरस्टाइलमध्ये तिचे केस बांधून, तिने गजराने ते सजवले. नरेश यांनी त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर चाहत्यांनी या खास प्रसंगी या जोडप्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.
नरेश हा दिवंगत तेलगू अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका विजया निर्मला यांचा मुलगा आहे. टॉलिवूड सुपरस्टार महेश बाबू त्याचा सावत्र भाऊ आहे. नरेशचे हे चौथे तर पवित्राचे तिसरे लग्न आहे. पवित्रा कर्नाटकची असून कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करते.
नरेश आणि पवित्र लोकेश 'संमोहनम' चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान प्रेमात पडले.काही काळ गुपचूप एकमेकांना डेट करत होते. तसेत अनेकदा कौटुंबिक सोहळ्यात सहभागी होताना दिसले. पवित्रा नरेशचे सावत्र वडील कृष्णा आणि आई विजया निर्मला यांच्या अंत्यसंस्कारात नरेशच्या शेजारी उभे होते.
पवित्रासोबत लग्न करण्याआधी नरेशचे तीन वेळा लग्न झाले होते, पण ते लग्न टिकले नाही. नरेश विभक्त झाल्यानंतर त्याची तिसरी पत्नी रम्या रघुपतीशी वाद सुरू आहेत. रम्या रघुपतीने नरेशला घटस्फोट देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, पवित्राने एका सॉफ्टवेअर इंजिनीअरसोबत लग्न केले, पण अखेर दोघांचा घटस्फोट झाला. नंतर, तिने अभिनेता सुचेंद्र प्रसाद यांच्याशी असलेल्या तिच्या नात्यामुळे देखील चर्चेत आली होती, परंतु ते देखील 2018 मध्ये वेगळे झाले. नरेश आणि पवित्रा यांनी त्यांच्या प्रेमाला आणखी एक संधी देत एकमेकांसोबत प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.