Anupam Kher Video: आम्ही एकमेकांवर जळायचो, खूप भांडायचो... अनुपम खेरनी सतीश कौशिक बद्दल उघड केलं गुपित

अनुपम यांनी मित्राच्या आठवणीत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Anupam Kher An Emotional Video
Anupam Kher An Emotional Video Instagram @anupampkher
Published On

Anupam Kher Posted An Emotional Video: अभिनेते आणि निर्माते सतीश कौशिक यांचे ९ मार्चला कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले. अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांची मैत्री ४५ वर्ष जुनी आहे. सतीश कौशल, अनुपम खेर यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग होते आणि राहतील असे त्यांनी म्हटले आहे.

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनुपम यांचे व्हिडिओ व्हायरल होत होते. अनुपम, सतीश यांच्या बाजूला बसून रडतानाचा व्हिडिओ सगळ्यांनीच पाहिला आहे. पुन्हा एकदा इमोशनल होत अनुपम यांनी मित्राच्या आठवणीत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अनुपम यांनी म्हटले आहे की, मी तुम्हा सर्वांशी यासाठी संवाद साधत आहे कारण मी माझ्या मित्राच्या जाण्याने दुःखी आहे. या या दुःखतातून मी बाहेर पडलेलो नाही.

Anupam Kher An Emotional Video
Jr NTR On Oscars: ऑस्कर आधीच RRR सिनेमाला मोठा धक्का, ऑस्कर सोहळ्यातून 'नाटू नाटू गाणं.. Jr. NTR चं धक्कदायक विधान

सतीश आपल्यात नाहीत याची जाणीव मला सतत होत आहे कारण गेली ४५ वर्ष आम्ही एकत्र होतो, आमची खूप घट्ट मैत्री होती. एक अशी सवय जी कधीही सुटू नये असे वाटते. आणि जेव्हापासून तो गेलाय, मला काही समझत नाहीये.'

अनुपम खेर पुढे म्हणाले, मी आज विचार करत होतो की जेऊ का? मी काय जेऊ? अचानक सतिशला फोन करायचं लक्षात आलं. मी फोन घेतला आणि त्याला फोन करणार इतक्यात आठवलं. मझ्यासाठी हे खूप कठीण आहे. कारण एखाद्या सोबत ४५ वर्ष घालवणं खूप मोठा काळ आहे.

आम्ही दोघांनी एकत्र स्वप्न पाहिली होती. नॅशनल स्कुल ओह ड्रामामध्ये आम्ही एकत्र होतो. वर्ष होते जुलै १९७५. त्यानंतर आम्ही एकत्रच राहायचो. तो डे स्कॉलर होता, मी हॉस्टलर होतो. त्याच्या घरी खाणं-पिणं व्हायचं. मग तो आधी मुंबईत आला आणि नंतर मी आलो. मुंबईत आल्यानंतर आम्ही खूप मेहनत केली. हे स्थान मिळवले, यशाचे शिखर गाठले.

अनेकदा असे व्हायचे की आम्ही एकमेकांवर जळायचो, भांडायचो, रागवायचो पण तरीही रोज सकाळी ८, साडे ८ ला एकमेकांना फोन करायचो. त्यामुळे कालपासून माझे कशातच मन लागत नाहीये. मी विचार करतोय काय करू, कारण मला यातून पुढे जावेच लागेल. माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी मूव्ह ऑन केलं. आज सतीश नाही, मला यातून देखील बाहेर पडावं लागेल. कारण जीवन आपल्याला हेच शिकवतं.

मी विचार केला की, जे विचार माझ्या मनात येत आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करावेत. त्यामुळे मला जर बरं वाटेल. हे सगळं सांगताना अनुपम रडू लागले. त्यांनतर स्वतःला सांभाळत म्हणाले जीवन थांबवून चालत नाही. मी जीवनात पुढे जात आहे मित्रा सतीश, तू सदैव माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग राहशील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com