प्रशांत नील दिग्दर्शित आणि 'बाहुबली' (Bahubali Movie) फेम प्रभासचा ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ चित्रपट (Salaar Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या सगळीकडेच प्रभासच्या सालारची चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिससोबतच जगभरामध्ये हा चित्रपट आपली जादू दाखवताना दिसत आहे. जबरदस्त कमाई करत हा चित्रपट एकापाठोपाठ एक नवे रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. प्रभासच्या सालाने रिलीजच्या ५ व्या दिवशी बक्कळ (Salaar Box Office Collection) कमाई केली आहे.
प्रभास, श्रुती हासन स्टारर 'सालार' चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवताना दिसत आहे. या चित्रपटाने केवळ सुरुवातीच्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवरच वर्चस्व गाजवले नाही तर ख्रिसमसच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा करून घेतला. या चित्रपटाने सोमवारसोबत मंगळवारी देखील जबरदस्त कमाई केली आहे. या अॅक्शन क्राईम थ्रिलरला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमार यांच्या या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'डंकी'ला टक्कर देत मागे टाकले आहे. हा चित्रपट प्रत्येक दिवसाला कोट्यवधींची कमाई करत आहे.
सालारच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल सांगायचे झाले तर, 'सालार'ने ९०.७ कोटींच्या कलेक्शनसह बंपर ओपनिंग केले होती. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५६.३५ कोटींचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी 'सालार'ची कमाई ६२.०५ कोटी रुपये इतकी होती. चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी चित्रपटाने ४६.३ कोटींची कमाई केली. 'सालार' रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी देखील चांगली कमाई केली आहे. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सालार' ने रिलीजच्या पाचव्या दिवशी २३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'सालार'ने रिलीज झाल्यानंतर आतापर्यंत एकूण २७८.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
बाहुबली: द बिगिनिंग आणि बाहुबली 2: द कन्क्लूजनच्या ब्लॉकबस्टर यशानंतर साऊथ सुपरस्टार प्रभासचे इतर चित्रपट फ्लॉप ठरले. आता प्रभासने 'सालार'द्वारे जबरदस्त कमबॅक केले आहे. या चित्रपटाने शाहरूख खानच्या डंकीला देखील जबरदस्त टक्कर दिली आहे. सालारने रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत जगभरात ४०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. या चित्रपटाने पाच दिवसांत जगभरात ४५० कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये पोहचण्यासाठी अवघे काही अंतर दूर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.