Kedar Selagamsetty Death: टॉलीवूड चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी येत आहे. चित्रपट निर्माते केदार सेलागमसेट्टी हे सोमवारी रात्री दुबईतील पाम जुमेराह येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले. दुबईतील एका पार्टीवरून घरी परतल्यानंतर झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. सेलागमसेट्टी यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगी आहे.
झोपेत असताना मृत्यू झाला
केदार सेलागमसेट्टी यांच्या निधनाच्या टॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. केदार सेलागमसेट्टी हे एक लोकप्रिय निर्माते होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सेलागमसेट्टी रविवारी दुबईमध्ये एका पार्टीला उपस्थित होते, त्यानंतर ते त्यांच्या अपार्टमेंटमध्ये परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठले नाही तेव्हा कळले की त्यांचे निधन झाले आहे.
तेलुगू चित्रपट निर्माते परिषदेने काय म्हटले?
तेलुगू चित्रपट निर्माते परिषदेच्या एका वरिष्ठ निर्मात्याने सांगितले की, 'आम्हाला अद्याप त्यांच्या मृत्यूबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही, तसेच त्यांचा मृत्यू कसा झाला हे देखील आम्हाला माहिती नाही.'
गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणात नाव आले होते
२०२४ मध्ये हाय-टेक सिटीमधील एका हॉटेलमध्ये सायबराबाद पोलिसांनी पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणात केदार सेलागमसेट्टी सहभागी असल्याने ते चर्चेत होते. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध ड्रग्ज घेतल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती..
सुकुमार आणि विजय देवरकोंडा सोबत एका मोठ्या प्रकल्पाची घोषणा केली होती
केदार सेलागमसेट्टीने सुकुमार आणि विजय देवरकोंडा यांच्यासोबत एका मोठ्या प्रकल्पाची घोषणाही केली होती. केदार सेलागमसेट्टी हे २०२४ च्या 'गम गम गणेशा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.