Sikandar: 'इंसाफ नहीं साफ करने आय हूँ...'; सलमान खानच्या 'सिकंदर'चा धमाकेदार टीझर रिलीझ

Sikandar teaser : सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये भाईजानचा स्वॅग दिसतोय. त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.
Sikandar Teaser
Sikandar TeaserGoogle
Published On

Sikandar: यावर्षी ईदच्या निमित्ताने सलमान खान त्याच्या सर्व चाहत्यांना ईदी म्हणून 'सिकंदर' हा चित्रपट भेट देणार आहे. त्याआधी भाईजानने या चित्राचा टीझर रिलीज केला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे.

'गजनी' चित्रपटाचे दिग्दर्शक एआर मुरुगादोस दिग्दर्शित 'सिकंदर' या चित्रपटात सलमानच्या सोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये भाईजानचा स्वॅग पाहायला मिळत आहे. या ईदला सलमान बॉक्स ऑफिसवर नक्कीच मोठी कमाई करेल यात काही शंका नाही.

Sikandar Teaser
Shah Rukh Khan: शाहरुख खान मन्नत सोडणार, नेमकं कारण काय?

सलमान खानच्या 'सिकंदर'चा टीझर

हा या चित्रपटाचा दुसरा टीझर व्हिडिओ आहे. याआधी डिसेंबर २०२४ मध्ये याचा पहीला टीझर रिलीज झाला होता, यामध्ये चाहत्यांना सलमान खूप आवडला होता. त्यात त्याचा एकच संवाद होता, हा टिझर देखील प्रेक्षकांना खूप आवडला होता.

Sikandar Teaser
Follower Movie: सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची गोष्ट; 'फॉलोअर' चित्रपटाचा टीजर लाँच

सलमान खान शेवटचा 'टायगर ३' चित्रपटात दिसला होता. डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. त्यात, आता तो या चित्रपटातून काय जादू करणार हे लवकरच समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com