Mahesh Babu And Dad Saam Tv
मनोरंजन बातम्या

महेश बाबूला पितृशोक, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा

पूर्वीचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि महेश बाबूचे वडिल घटामनेनी शिव रामा कृष्ण मूर्ती यांचे आज वयाच्या ७९व्या वर्षी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Telagu Superstar Krishna Passes Away: पूर्वीचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि महेश बाबूचे वडिल घटामनेनी शिव रामा कृष्ण मूर्ती उर्फ कृष्णा यांचे आज वयाच्या ७९व्या वर्षी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. सोमवारी पहाटे कृष्णा यांना हृदयविकाराचा झटका आला होता. लगेचच त्यांना हैद्राबाद येथील कॉन्टिनेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

काहीच महिन्यांआधी महेशच्या आईचे निधन झाले होते, आता काही दिवसातच त्याच्या वडिलांचे जाणे हे त्याच्यासाठी फारच धक्कादायक आहे. ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील खुप मोठे सुपरस्टार होते. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी हळहळ व्यक्त करत असून त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे योगदान दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी फार वेगळेच होते.

कृष्णा यांनी 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला तेलुगू चित्रपटांतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. काही काळातच त्यांना एक अग्रगण्य व्यक्ती म्हणून मोठे यश मिळाले. 1980 च्या दशकात त्यांना चित्रपट उद्योगात सर्वोच्च स्थान कायम होते. 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 350 हून अधिक चित्रपट केले.

शिवाय त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचे कित्येक चाहते आणि मनोरंजनसृष्टीतील कित्येक दिग्गज सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनीदेखील याविषयी शोक व्यक्त केला आहे.

रडिका सरथकुमारने आपल्या ट्विटरवर सुपरस्टारच्या निधनाचे शोक व्यक्त केले आहे. तिने लिहिले, "#कृष्णागरू या व्यक्तीच्या निधनाने खूप दुःख झाले ज्याने #SuperStarKrishna म्हणून उत्कृष्ट ठसा उमटवला. त्यांच्या आत्म्याला #RIPKrishnaGaru ही सदिच्छा देवो. या कठीण प्रसंगी @urstrulyMahesh आणि कुटुंबियांना माझ्या संवेदना.

कृष्णा यांनी आयुष्यात दोनदा लग्न केले. त्यांची पहिली पत्नी इंदिरा होती, जिच्यापासून त्यांना पाच मुले होती - रमेश बाबू, महेश बाबू, पद्मावती, मंजुळा आणि प्रियदर्शनी. त्यांची दुसरी पत्नी अभिनेत्री-चित्रपट निर्मात्या विजया निर्मला होती. या वर्षी 28 सप्टेंबर रोजी इंदिराजींचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

SCROLL FOR NEXT