Urfi Javed New Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Trolled: उर्फीही रंगली 'बेशरम रंगा'त, दीपिकानंतर तिचा भगव्या कपड्यातील 'तो' Video चर्चेत...

फॅशन ट्रेंडमध्ये चर्चेत राहूनही उर्फी का ट्रोल होते?

Chetan Bodke

Urfi Javed: उर्फी जावेद सध्या महाराष्ट्रात कमालीची चर्चेत आहे. ती नेहमीच आपल्या विचित्र फॅशनने सोशल मीडियावर प्रकाशझोतात असते. बऱ्याच वस्तूंचा वापर करत ती फॅशन करण्याचा प्रयत्न करते पण ती कधी चर्चेत राहून कमालीची ट्रोल होते. अशातच आता उर्फीलाही दीपिकाच्या 'बेशरम रंग' गाण्याचा मोह आवरला नाही.

सध्या शाहरुख- दीपिकाचा 'पठान' चित्रपट बराच ट्रोल होत आहे. चित्रपट ट्रोल होण्याचे कारण म्हणजे, बिकीनीवरुन झालेला वाद. अशातच आता दीपिकाच्या बिकीनीवरुन तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. कदाचित आता हा वाद पुन्हा एकादा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण आता उर्फीने भगव्या रंगाचे विचित्र कपडे घालून गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होत असून तिला ट्रोल केले जात आहे. या व्हिडीओत तिने भगव्या रंगाचे कपडे घातले आहे. भगव्या रंगाचा कट आऊट बोल्ड ड्रेस घातला असून बॅक ग्राऊंडला 'बेशरम रंग' गाणं वाजत आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिले नसून मात्र कमेंट्सने सर्वांचेच लक्ष वेधत आहे.

उर्फीला कपड्यांवरुन ट्रोल करणं ही काही पहिली वेळ नाही. ती नेहमीच तिच्या कपड्यांवरुन, तर कधी स्टाईलमुळे चर्चेत राहते. पण या भगव्या रंगाच्या कपड्यावरुन आधी दीपिका ट्रोल झाली होती, आता उर्फी पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या कचाट्यात सापडली आहे. उर्फीला या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट्स आल्या आहेत.

उर्फीच्या कमेंटवर नेटकरी म्हणतात, 'हिने जाणून बुजून भगव्या रंगाचे कपडे घातले आहेत' असं एक नेटकरी म्हणत आहे, तर आणखी एक नेटकरी म्हणतो, 'ही फक्त कॉन्ट्रोवर्सीसाठी असे कृत्य करते. सर्वांचे लक्ष उर्फी स्वत:कडे वेधून घेण्याचे प्रयत्न करते.' तर आणखी एक युजर म्हणतो, 'प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे कृत्य करत असून पॉर्न स्टारलाही ती मागे टाकते.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT