Tunisha Sharma: २०२२ या वर्षात बऱ्याच टेलिव्हिजन कलाकारांनी आपले जीवन आत्महत्या करत संपवले. नुकतंच काल एका टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीच्या आत्महत्येने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. 'अलीबाबा दास्तान-ए-काबुल' फेम अभिनेत्री टुनिशा शर्माने काल मालिकेच्या सेटवर गळफास घेत आपले जीवन संपवले. तिच्या निधनाच्या बातमीनं अवघी टेलिव्हिजन इंडस्ट्री पुन्हा एकदा हळहळली आहे. टुनिशाच्या निधनानंतर पुन्हा एकदा कलाकारांच्या मानसिकतेवरील प्रश्न उद्भवू लागला आहे.
अवघ्या वीशीतल्या या अभिनेत्रीचा काही दिवसांवरच वाढदिवस येऊन ठेपला होता. येत्या ४ जानेवारी रोजी टुनिशा आपला २१वा वाढदिवस मोठ्या धुमडाक्यात साजरा करणार होती. परंतू तिने आपल्या वाढदिवसाधीच इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने तिच्या चाहत्यांसह परिवारातील सदस्यांनाही धक्काच बसला आहे. तरुण वयातच टुनिशा शर्माने इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले होते. 4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये जन्मलेली टुनिशा आपल्या कामात नेहमीच गंभीर राहायची.
आपल्याला आयुष्यात कसं जगायचं आहे हा विचार ती इतक्या लहान वयात करत होती. टुनिशा सेटवरही नेहमी आनंदी असायची. सोबतच सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असायची आणि अनेकदा तिच्या आयुष्यातील काही खास क्षण ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करायची.
टुनिशा येत्या ४ जानेवारीला तिचा २१ वा वाढदिवस साजरा करणार होती. गेल्या वर्षी तिने वाढदिवस आपल्या कुटुंबियांसोबत साजरा केला होता. त्यातील आता खास आठवणी सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.
तिने गेल्या वर्षी शेअर केलेले काही खास व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये टुनिशा आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसत आहे. पण हे सर्व टुनिशाचे आनंदी फोटो पाहून ती आता आपल्यासोबत नाही यावर विश्वास ठेवणे सुद्धा चाहत्यांना कठीण होत आहे.
टुनिशा शर्माच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तिचा सहकलाकार शीजान खानला अटक केली आहे. अभिनेत्रीच्या आईने शीजनवर तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. लवकरच त्याला न्यायालयातही हजर होण्यासाठी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.