Hetal Yadav Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hetal Yadav: अभिनेत्री हेतल यादवच्या कारला ट्रकची धडक, 'अशा प्रकारे वाचवला जीव' शेअर केली हृदयद्रावक घटना

स्टार प्लसवरील इमली मालिकेमध्ये शिवानी राणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हेतल यादवचा काल रात्री मुंबईत हायवेवर अपघात झाला आहे.

Chetan Bodke

Hetal Yadav: स्टार प्लसवरील इमली मालिकेचे चाहत्यांच्या मनावर आजही अधिराज्य कायम आहे. टॉप ५ मालिकेत आजही मालिकेचा समावेश नेहमी होतो. या शोमध्ये शिवानी राणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हेतल यादव हिचा काल रात्री मुंबईत हायवेवर अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी मालिकेची शूटिंग संपवून घरी परतताना तिच्या कारला एका भरधाव ट्रकने धडक दिली आहे. त्यावेळी हेतल स्वत: गाडी चालवत होती, तिचा अपघात झाल्याची माहिती स्वत: हेतलने आपल्या मुलाला फोनवरुन दिली. या अपघातात तिला कोणतीही इजा झाली नसून या अपघाताची तिव्रता पाहता मनात थोडी भिती निर्माण झाली आहे.

या अपघाताबद्दल हेतलने एका इंग्रजी संकेतस्थळासोबत संवाद साधला. त्यावेळी ती म्हणाली, "मी काल रात्री 8:45 च्या सुमारास शूटिंग संपवून घरी निघाले. मी JVLR हायवेवर पोहोचताच एक ट्रक माझ्या कारला धडकला आणि त्या ट्रकने माझ्या कारला पुलाच्या बाजुला ढकलले. उड्डाणपुलावरुन माझी कार खाली पडली असती. पण लगेचच गाडीचा स्पीड आवरत ट्रकसमोर गाडी थांबवली आणि लगेचच वेळ न दवडता मुलाला फोन केला."

सोबतच ती पु्ढे बोलते,"मी त्याला पोलिसांना कळवण्यास सांगितले कारण या घटनेनंतर मला खूप मोठा धक्का बसला होता. पण सुदैवाने मला कोणतीही हानी झाली नाही. मला सकाळी लवकर सेटवर जावे लागले कारण शोमधील एका महत्त्वपूर्ण सीक्वेंसचे शूटिंग चालू आहे. अनपेक्षित परिस्थिती असूनही माझ्यामुळे शूट थांबू नये असे मला वाटत होते."

हेतलेने 'बालिका वधू', 'बॅरिस्टर बाबू', 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा' यासारख्या शोमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan Special : बहिण-भावाच्या नात्यात वाढेल गोडवा, रक्षाबंधनला घरीच झटपट बनवा 'ड्रायफ्रूट केक'

Date Night: पहिल्या डेटवर तुमच्या जोडीदाराला 'हे' प्रश्न नक्की विचारा

Astro Tips: संध्याकाळी दिवा लावण्याची वेळ कोणती?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी शिवसेना का फोडली? 3 वर्षानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली आतली बात

Ind vs Eng : कॅच सुटला की, मॅच? मोहम्मद सिराजची मोठी चूक अन् इंग्लंडला मिळालं जीवनदान, शुभमन गिल भडकला; Video

SCROLL FOR NEXT