Debina And Gurmeet Instagram @guruchoudhary
मनोरंजन बातम्या

देबिना वर्षात दोनदा आई, शेअर केला मातृत्वाचा अनुभव

काही दिवसांपूर्वीच देबिना मुखर्जीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या दोघांच्या लग्नाला तब्बल 11 वर्ष पूर्ण झाले असून त्यांनी आता आई- वडील होण्याचा निर्णय घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचे आई होण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आलिया भट्टने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यातच आणखी एका अभिनेत्रीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच देबिना मुखर्जीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. टेलिव्हिजन वरील सुप्रसिद्ध जोडी म्हणून गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीकडे पाहिले जाते. या दोघांच्या लग्नाला तब्बल 11 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानंतर त्यांनी आई- वडील होण्याचा निर्णय घेतला.

एप्रिल महिन्यात त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून आता काही दिवसांपूर्वीच गुरमीत-देबिनाच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झाले आहे. एका वर्षात देबिनाचा दुसऱ्यांदा आई होण्याचा अनुभव फारच अवघड होता.

नुकतंच एका मुलाखतीत देबिनाने याबद्दलचा खुलासा केला. पहिली मुलगी लियानच्या जन्मानंतर अवघ्या सात महिन्यातच पुन्हा आई झाल्याचा खुलासा केला. नैसर्गिकरीत्या तिला आई होण्यासाठी तिला फारच संघर्ष करावा लागला होता.

तिने यासाठी आयव्हीएफ प्रणालीचा वापर केला. तिने एका मुलाखतीत उपचारावेळीचा अनुभव सांगितला आहे. त्यावेळी देबिना म्हणते, "मी या प्रणालीसाठी एकूण चार फेऱ्यांचा पर्याय निवडला होता. त्यावेळी अनेक प्रक्रिया अयशस्वी ठरत होत्या.

अनेक प्रयत्न केल्यानंतर मी लियानच्या वेळी गरोदर राहिले. पण त्यापूर्वी मी गर्भधारणेसाठी इतकी सक्षम नव्हते, हे मला माहीत होते. मला आमचे अनेक नातेवाईक नेहमी विचारायचे की, तू कधी बाळाला जन्म देशील? माझ्या आयुष्यातील हा काळ फार खडतर होता. कारण त्यावेळी लोकांनी खरं मानत त्याचा स्विकार केला."

"माझ्या समोर अनेकदा तू कधी आई होणार ? हा प्रश्न उपस्थित केला जायचा. पण आयुष्यातील हा एकमेव असा क्षण आहे का आनंदाचा देणारा? जर मी आई होणार नसेन तर मी तुम्हाला एक माणूस म्हणून आनंदीत करू शकत नाही का ? त्यावेळी असे अनेक प्रश्न मला पडायचे.

त्याचा मला फार त्रास ही व्हायचा. कदाचित ही आनंदाची गोष्ट असेलही पण प्रयत्न करुनही जर ती गोष्ट होत नसेल तर ती फार वेदनादायी गोष्ट असते. आयव्हीएफच्या त्या उपचारांमुळे मी त्या काळात छोट्या-छोट्या गोष्टींवरुन खूप संवेदनशील व्हायची." असेही ती म्हणाली.

"त्या काळात माझ्यावर ट्रीटमेंट सुद्धा सुरू होत्या. माझ्या शरीरात अनेक हार्मोन्स सक्रिय होते, त्यामुळे माझ्या वजनातही वाढ होत होती. माझे पोटही वाढले होते. मला त्यावेळी तू आई आहेस का असाही प्रश्न बऱ्याच नेटकऱ्यांनी विचारला होता. पण मला काय उत्तर द्यावे हे कळत नव्हतं.

अनेकदा मला रुग्णालयात जाता-येताना चाहत्यांनी पाहिले होते. मी गरोदर आहे, पण लपवत आहे, असेही अनेकजण म्हणायचे. पण मी गरोदर नाही हे त्यांना कसे सांगू? मी प्रयत्न करतेय हे कसं सागू हेच मला कळत नव्हते. मला त्या दिवसांत खूप अस्वस्थ वाटायचे." असेही देबिना म्हणाली.

देबिना आणि गुरमितचे २०११ मध्ये लग्न झाले होते. देबिनाने या वर्षात दोन मुलींना जन्म दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT