Milind Gawali Social Media Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Milind Gawali Post: ‘आजपर्यंत मला ज्यांनी नाचवलं त्या...’ म्हणत मिलिंद गवळीने शेअर केला भन्नाट किस्सा

Milind Gawali Social Media Post: मिलिंद गवळीने शेअर केलेली पोस्ट चाहत्यांना एक प्रेरणा देणारी ठरली आहे.

Chetan Bodke

Milind Gawali: ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर मिलिंद गवळी नेहमीच विविध पोस्ट शेअर करत असतो. फिट आणि हँडसम असणारे मिलिंद गवळी त्यांच्या फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच मिलिंद गवळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळीने शेअर केलेली पोस्ट चाहत्यांना एक प्रेरणा देणारी ठरली आहे. एखादी असाध्य गोष्ट आपण सहज कशी साध्य करू शकतो, हे मिलिंदने साध्या शब्दात सांगितलं आहे.

मिलिंद गवळीने आज सोशल मीडियावर एक डान्स करतानाचा व्हिडिओ शेयर केला आहे, त्या व्हिडीओला कॅप्शन देत त्याने आपल्या भावना शेअर केल्या आहेत. मिलिंद गवळी म्हणतो, “ “प्रयत्नांती / प्रयत्नार्थी परमेश्वर”आपल्या लहानपणापासून आपल्या काही धारणा बनत जातात,प्रत्येकाच्या वेगवेगळ्या धारणा मनामध्ये घट्टपणे बिंबवून ठेवल्या जातात, आणि मग आयुष्यभर त्ते प्रामाणिकपणे त्याचं पालन करत राहतात.”

“उदाहरणार्थ काही लोकांची स्वतःबद्दलची अशी धारणा असते की त्यांना आयुष्यात ड्राइविंग कधीच करता येणार नाही, मग ड्रायव्हिंग करायच्या ते कधी भानगडीतच पडत नाही, मग ड्रायव्हर आला नाही म्हणून त्याच्यासाठी दोन तास थांबणारी लोकही मी बघितले.” (Entertainment News)

मिलिंद गवळी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो, “आणि माझं उलट होत होतं ड्रायव्हर जर पाच दहा मिनिटे उशिरा आला तर मी गाडीत बसायचो आणि shooting लाल निघून जायचो आणि driver ला त्या दिवशी सुट्टीच द्यायचो, कदाचित म्हणुन बिचारे माझे प्रवीण आणि जितेश कधी उशिरा यायचे नाही.” (Marathi Actress)

“पण माझ्या मनामध्ये लहानपणापासून वेगळीच धारणा किवा भिती बसली होती "मला नाचता येत नाही", त्यामुळे लग्नामध्ये वरातीत आणि गणपतीत जसे बिनधास्त नसतात कोणाचं कोणाला काही घेणं देणं नसतं तसा नाच मला येतो पण सिनेमातला नाच हा मला काही जमणार नाही असं माझ्या मनाने ठरवूनच टाकलं होतं आणि त्या पद्धतीनेच मी इतकी वर्ष वावरत होतो.”

पुढे मिलिंद गवळी म्हणतो, “अचानक स्टार प्रवाहने मला perform करायला सांगितलं, दिग्दर्शक वैभव घुगे यांना मी म्हटलं की माझ्या ऐवजी दुसरा कोणीतरी नाचणारा कलाकार घ्या म्हणजे तुमचं काम सोपं होईल, वैभव घुगे म्हणाले की आम्हाला तुम्हीच हवे आहात, मी म्हणालो पण मला नाचता येत नाही, ते म्हणाले ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही फक्त हो म्हणा.”

“जीव मुठीत धरून मी हो म्हटलं, complete घाबरलोच होतो.. कारण त्याआधी एका कोरिओग्राफरने मला humiliate केलं होतं. आता तो अनुभव परत नको वाटत. वैभव घुगे स्वतः एवढा विश्वास दाखवतोय म्हटल्यावर , आपण पण प्रयत्न करायला काय हरकत आहे असा विचार करून उतरलो मैदानात.”

“बघा त्यानंतर तीन वेळा स्टार प्रवाह साठी मी perform केलं आहे.तर माझ्या सांगायचं उद्देश असा हा की ... प्रयत्न केले, आणि correct guide करणारा वैभव घुगे सारखा किंवा अनिल शिंदे सारखा तुम्हाला मिळाला सोहम सारखा तुम्हाला मिळाला तर काहीही अशक्य नाही आहे.”

“आज पर्यंत मला ज्यांनी ज्यांनी नाचवलं त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. सुबल सरकार, नरेंद्र पंडित ,हबीबा, वैभव घुगे, अनिल शिंदे, शिवम वानखडे, कार्तिक पौल ... तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आली नसती तर कदाचित माझे पाय जमिनीवरून वर ऊठले नसते.”

“पण आता आयुष्यात प्रयत्न करायचे असं मी ठरवलेलं आहे. मग जे होईल ते होईल. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि मग बघा गोष्टी तुम्हाला साध्य होतात की नाही. होतीलच हो का नाही होणार..” अशा शब्दात मिलिंद गवळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT