Khupte Tithe Gupte Latest Episode Promo: सध्या झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंदी मिळत आहे. सध्या या कार्यक्रमाची टेलिव्हिजन सृष्टीत चांगलीच चर्चा होत असून पुढच्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या शो मध्ये आतापर्यंत राज्यातील अनेक बड्या राजकारण्यांनी हजेरी लावली आहे. नुकतेच या शो मध्ये राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली आहे. सध्या या शोचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यामध्ये अवधूतने विचारलेल्या प्रश्नांची बरीच चर्चा सुरू आहे.
अवघ्या काही मिनिटांच्या या प्रोमोमध्ये अमोल कोल्हेंनी अवधूतने विचारलेल्या प्रश्नांची रोखठोक उत्तरं दिली आहेत.
यावेळी सध्या राज्यात सुरु असलेल्या अनेक चर्चांवर त्यांनी उत्तरं दिली. यावेळी अवधूतने अमोल कोल्हे यांना तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा होत आहे.
त्यावर अमोल कोल्हे म्हणाले, “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे उगाच मी नांगर खांद्यावर घेऊन चालत नाही. आधी आभाळ बघून मग जमीन कधी नागरायची ते ठरवायला लागतं. हे राजकीय उत्तर आहे. पण खरं उत्तर हे आहे की….” असं उत्तर अमोल कोल्हे यांनी दिलं आहे. पुढे अमोल कोल्हे यांचं उत्तर काय असणार, हे ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अमोल कोल्हे यांचं सविस्तर उत्तर येत्या रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सोबतच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये, अमोल कोल्हेंच्या समोर काही मेडिसीन्स ठेवतो, आणि त्या गोळ्या ते डॉक्टर म्हणून कोणाला पाठवणार याची माहिती त्यांना सांगायची.
टीझरच्या सुरूवातीला अवधूत खासदार अमोल कोल्हे यांना पहिली डोकेदुखीची गोळी दाखवतो, ती गोळी अमोल कोल्हेंना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवायला आवडेल, असं अमोल कोल्हे म्हणतात.
तर दुसरी गोळी स्मरणशक्ती वाढवण्याची गोळी आहे. ही गोळी त्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवायला आवडेल, असं म्हणतात
तर तिसरी गोळी एनर्जी वाढवायची गोळी आहे, ती त्यांना स्वत:लाच घ्यायला आवडेल. कारण लवकरच निवडणुका आहेत, प्रचार देखील करायचाय, त्यामुळे त्यांना ती गोळ्या घ्यायला आवडेल, असं देखील अमोल कोल्हे म्हणतात.
सोबतच येत्या रविवारी टेलिकास्ट होणाऱ्या एपिसोडमध्ये खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी एक प्रश्न उपस्थित केला, अमोल कोल्हे म्हणतात, “शरद पवारांनी हिंजवडीत आयटी पार्क स्थापन केलं, त्यानंतर 20 वर्षांनी आयटी प्रोफेशनल विचारतो की, शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? ज्या माणसांनी हे सगळं आणलंय त्याला आपण म्हणणार?”.
यावेळी अवधूतने अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे असलं पाहिजे, अजित पवार की सुप्रिया सुळे? असा प्रश्न विचारला. अवधूतच्या या प्रश्नावर अमोल कोल्हेंनी शरद पवार असं उत्तर दिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.