Gaurav More Impressed To Juhi Chawla Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gaurav More Video : ‘मॅडनेस मचाएंगे’मध्येही गौरव मोरेचीच हवा, हटक्या पद्धतीने केलं जुही चावलाला इम्प्रेस; पाहा व्हिडीओ

Gaurav More Madness Machayenge Video : गेल्या काही दिवसांपूर्वीच गौरव मोरे ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमातून चाहत्यांचे मनोरंजन करीत आहे. अवघ्या कमी वयातच गौरव मोरेनेही शोमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकले.

Chetan Bodke

Gaurav More Impressed To Juhi Chawla Video

हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच गौरव मोरे ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमातून चाहत्यांचे मनोरंजन करीत आहे. अवघ्या कमी दिवसातच गौरव मोरेनेही या शोमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकले. गौरव मोरेचा सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे, त्यामध्ये त्याच्या कॉमेडीवर बॉलिवूड सेलिब्रिटीही पोट धरून हसताना पाहायला मिळत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. (Televesion Show)

सोनी टेलिव्हिजनच्या इन्स्टा पेजवर हा प्रोमो शेअर केलेला आहे. या प्रोमोमध्ये, ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ चक्क बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. प्रोमोच्या सुरूवातीला किंग खानच्या ‘डर’ चित्रपटातील ‘तू है मेरी किरण!’ या गाण्यावर गौरव मोरे परफॉर्मन्स करताना दिसतोय. जुही चावला आणि शाहरुख खान हे दोघेही चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत होते. या प्रोमोमध्ये अगदी शाहरूख खानप्रमाणेच, गौरव मोरेही आयकॉनिक पोजेस देताना तो दिसतोय. (Viral Video)

प्रोमोमध्ये, जुही स्टेजवर येताना दिसतेय. जुही स्टेजवर आल्यानंतर गौरव तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करताना दिसतोय. त्यानंतर तिला इम्प्रेस करण्याचाही प्रयत्न केला. तर त्यासोबतच गौरव जुहीला गुडघ्यावर बसून गुलाब देतानाही दिसत आहे. हे सगळं पाहून अभिनेत्री जुहा चावलाही आनंदी होते. पुढे, या स्किटमध्ये सुगंधाची एन्ट्री होती. गौरव आणि सुगंधाच्या संभाषणावर जुही खळखळून हसताना दिसते. हा एपिसोड येत्या शनिवार-रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्या व्हायरल होणाऱ्या टीझरवर प्रेक्षकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (Hindi Television)

गौरव मोरेला हास्यजत्रेतून फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्याला हास्यजत्रेतून 'फिल्टर पाड्याचा बच्चन' म्हणून ओळख मिळाली आहे. गौरव हास्यजत्रेव्यतिरिक्त इतर प्रोजेक्ट्स मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गौरव मोरे गेल्यावर्षी 'अंकुश', 'बॉइज ४', 'सलमान सोसायटी', 'लंडन मिसळ' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर लवकरच प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेल्या 'महापरिनिर्वाण' चित्रपटातही गौरव मोरे दिसणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT