एक शो दोन विजेते, 'Dance Deewane 4'च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं; गौरव-नितिनला ट्रॉफीसह मिळाले लाखो रुपयांचं बक्षीस
Dance Deewane 4 Winner Saam Tv
मनोरंजन बातम्या

एक शो दोन विजेते, 'Dance Deewane 4'च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं; गौरव-नितिनला ट्रॉफीसह मिळाले लाखो रुपयांचं बक्षीस

Chetan Bodke

माधुरी दिक्षित आणि सुनील शेट्टीच्या 'डान्स दिवाने ४'चा नुकताच दिमाखदार महाअंतिम सोहळा पार पडला. पण यामध्ये, एक ट्वीस्ट आहे. यंदाच्या सीझनला एक नाही तर दोन फायनलिस्ट मिळालेले आहे. दिल्लीचा २२ वर्षीय गौरव शर्मा आणि बंगळुरूच्या १९ वर्षीय नितिन एनजेने या रिॲलिटी शोचा किताब मिळवलेला आहे. दोघांनाही बक्षीस म्हणून २० लाख रुपये मिळालेले आहेत.

'डान्स दीवाने' या कार्यक्रमाने साडे तीन महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नितिनने आणि गौरवने 'डान्स दीवाने'साठी वेगवेगळ्या ऑडिशन दिल्या होत्या. पण पुढे फायनलसाठी यांनी एकत्र परफॉर्म केला. एकत्र विजेते होऊनच कार्यक्रमातून बाहेर पडले आहेत. दोघांनाही बक्षीस म्हणून २० लाख रुपये मिळालेले आहेत. पण हे दोघेही या बक्षीसाचं काय करणार आहेत ? याबद्दल सांगितले आहे.

टीव्ही ९ भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत नितिनने आणि गौरवने सांगितले की, आम्हाला दोघांनाही २० लाख रुपये बक्षीस मिळाले आहेत. पण आम्ही ही रक्कम अर्धी वाटून घेतली आहे. जिंकलेली रक्कम नितीन आई- वडीलांना देणार आहे. आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन मी शॉपिंग करणार आहे. तर गौरवने सांगितले जिंकलेली अर्धी रक्कम आई- वडीलांना देणार आहे. तर उरलेल्या रक्कममध्ये मी माझ्या मैत्रीणीसोबत फिरायला जाणार आहे.

गौरव आणि नितीन, युवराज आणि युवांश, चिराश्री आणि चैनवीर, श्रीरंग आणि वर्षा, दिव्यांश आणि हर्ष, काशवी आणि तरनोज या जोड्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली होती. पण शेवटी गौरव आणि नितिन यांनी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reliance Jio New Plans: जबरदस्त! रिलायन्स जिओने युजर्ससाठी आणले 3 नवीन प्लॅन, जाणून घ्या फायदे

Jui Gadkari : जुई गडकरी म्हणजे सौंदर्याची खाण...

Mumbai Local Train News: मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत; गाड्या 10-15 मिनिटे उशिरा

CNG -PNG Price: सीएनजी-पीएनजीच्या दरात होणार वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; जाणून घ्या नवे दर

Marathi Live News Updates: मालेगाव-मनमाड रोडवरील नांदगाव फाटाजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT