Pooja Joshi Arora Blessed With A Baby Girl Instagram
मनोरंजन बातम्या

Pooja Joshi Arora 2nd Baby Girl: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्रीच्या घरी लक्ष्मी आली, पोस्ट शेअर करत दिली चाहत्यांना ‘गुड न्यूज’

Yeh Rishta Kya Kehlata Hai Actress: प्रसिद्ध टेलिव्हिजन सीरियल ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री पूजा जोशीने आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

Chetan Bodke

Pooja Joshi Arora Blessed With A Baby Girl: प्रसिद्ध टेलिव्हिजन सीरियल ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम (अक्षराची भाभी) वर्षा या भूमिकेतून प्रकाशझोतात आलेल्या टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा जोशीने आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अभिनेत्री पुजा आणि पती मनीष अरोरा पुन्हा दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने ११ ऑगस्टला अर्थात शुक्रवारी अभिनेत्रीने आणि तिच्या पतीने सोशल मिडीयावर ही गुड न्यूज शेअर केली आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा जोशी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना म्हणते, “मी आज देवाच्या आशिर्वादाने एका बाळाला जन्म दिला आहे. कृपया आपण सर्वांनीच आशिर्वाद द्यावा.” लग्नाच्या ८ वर्षांनंतर अभिनेत्रीने दुसऱ्यांदा चाहत्यांना गोड बातमी दिली. अभिनेत्रीने आपल्या मुलीचे नाव ‘रुहानी’ ठेवले आहे.

Pooja Joshi Arora 2nd Baby Girl

पूजा जोशीने चाहत्यांसोबत १९ जुलैला सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टच्या माध्यमातून गुड न्यूज दिली होती. त्यावेळी पोस्टमध्ये अभिनेत्रीने ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याची देखील माहिती दिली होती. अभिनेत्रीने शेअर केलेल्या रीलमध्ये आपल्या पतीसोबत, कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवताना दिसली होती. पूजाच्या चेहेऱ्यावर आनंद स्पष्टपणे जाणवत होता. अभिनेत्रीच्या कुटुंबाने एकत्रितपणे ‘लवकरच येत आहे’ अशा शब्दांसह बाळाच्या आगमनाची घोषणा करणारी स्लेट ठेवली होती.

टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा जोशी आणि पती मनीष अरोराने २५ नोव्हेंबर २०१५ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांची मैत्री एका कॉमन मित्राकडून झाली होती. पुढे त्यांच्या मैत्रीचे रूपांतर, लग्नामध्ये झाले. अभिनेत्रीने तिच्या पहिल्या गरोदरपणामध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’नंतर तिने काही दिवस ब्रेक घेतला होता. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमुळे ती फारच प्रसिद्धीझोतात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT