Sur Nava Dhyas Nava New Anchor Instagram
मनोरंजन बातम्या

Sur Nava Dhyas Nava New Anchor: ‘सुर नवा ध्यास नवा’मधून स्पृहा जोशीची एक्झिट, ‘ही’ अभिनेत्री करणार सूत्रसंचालन

Sur Nava Dhyas Nava Announcement: ‘सुर नवा ध्यास नवा’चा आगामी सीझन येत्या ७ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे.

Chetan Bodke

Sur Nava Dhyas Nava New Anchor

येत्या ७ ऑक्टोबरपासून ‘सुर नवा ध्यास नवा’चा आगामी सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनची घोषणा, ‘ढोलकीच्या तालावर’या टेलिव्हिजन शोच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. या शोचे आतापर्यंत एकूण पाच सीझन भेटीला आले आहेत. ‘सुर नवा ध्यास नवा’चा आगामी सीझन ७ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यावेळी या शोची नवी होस्ट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता स्पृहा जोशीनंतर मराठमोळी अभिनेत्री होस्ट म्हणून भेटीला येणार आहे.

या आगामी पर्वामध्ये प्रेक्षकांना एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. पहिल्या पर्वामध्ये तेजश्री प्रधानने सूत्रसंचालन केले होते, तर पुढच्या सर्वच सीझनचं होस्टिंग स्पृहा जोशीने केली होती. आता आगामी सीझनचं होस्टिंग स्पृहा जोशी करणार नाही. स्पृहा एक उत्तम अभिनेत्रीसह एक उत्तम होस्ट देखील ती होती. सहाव्या सीझनचं होस्टिंग ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनील होस्टिंग करणार आहे. रसिका आता प्रेक्षकांना एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या ‘ढोलकीच्या तालावर’ या मालिकेतून ‘सुर नवा ध्यास नवा’ची घोषणा केली. यावेळी प्रेक्षकांना स्पृहा जोशी शोची होस्ट म्हणून पाहता येणार नाही, तर तिच्या ऐवजी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी टेलिव्हिजन अभिनेत्री रसिका सुनीलला पाहता येणार आहे. तर कार्यक्रमामध्ये परिक्षकेच्या भूमिकेत अवधूत गुप्ते आणि महेश काळेच दिसणार आहेत. नव्या ॲंकरची घोषणा त्यांनी इन्स्टाग्राम व्हिडीओतूनही केलेली आहे.

यावेळी तिचा परिचयही करुन देण्यात आला आहे. रसिकाच्या ह्या परिचय करुन देणाऱ्या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिले की, “महाराष्ट्राच्या मनावर राज्य करायला येतेय ‘सुर नवा ध्यास नवा’ची नवी अँकर - रसिका सुनील! पाहा ‘सुर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा ग्रँड प्रीमियर’ ,शनि - रवि, ७ ऑक्टोबरपासून, रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही जियो सिनेमावर.”

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT