Rupali Bhosle Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rupali Bhosle Post: ‘माझ्या वाट्याला सिनेमे आलेच नाहीत’, ‘विनाकारण राजकारण’साठी ॲवॉर्ड मिळाल्यानंतर असं का म्हणाली रुपाली भोसले?

Chetan Bodke

Rupali Bhosle Post

अनेक टेलिव्हिजन मालिकेच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या रुपाली भोसलेने चित्रपटांमध्ये का काम केले नाही? याचा खुलासा तिने केला आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या माध्यमातून रुपाली भोसले चर्चेत आली आहे. तिने आपल्या सिनेकारकिर्दित अनेक हिंदी मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तिने फक्त मालिकेतच नाही तर काही नाटकांमध्ये सुद्धा प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यासोबतच तिने ‘बिग बॉस मराठी २’मध्येही स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.

कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या रुपालीने आजवरच्या मनोरंजन कारकिर्दित चित्रपटांमध्ये काम का केले नाही. यामागील कारण तिने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. रुपाली पोस्ट करत म्हणाली, “Larger than life सिनेमाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सिनेमा हे larger than life असतं. आणि ते अगदी खरं आहे, सिनेमा थिएटर मध्ये गेल्यानंतर ते आपल्या सगळ्यांना जाणवतं, भव्य दिव्य थिएटर, अगदी छान comfortable seat, air-conditioning, आणि खूप मोठा पडदा, ज्याच्यावर आपल्याला सिनेमा दिसतो. मोठ मोठे speakers मधून आपल्याला sound आणि music ऐकायला मिळतं. तीन तासांमध्ये एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो, तसा अनुभव आपल्याला टेलिव्हिजनवर कधी मिळणार नाही, कारण टेलिव्हिजनचा पडदा छोटा असतो.”

रुपाली पुढे पोस्टमध्ये म्हणते, “आजपर्यंत मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही सिनेमे का नाही करत, किंवा तुम्ही आजपर्यंत सिनेमे का नाही केले?, पण असं नाहीये की मला सिनेमा करायचा नव्हता, माझ्या वाटेला सिनेमे आलेच नाहीत, आले ते पण खूप मोजके आले, मला खरंच आवडलं असतं सिनेमा करायला आणि मला अजूनही सिनेमे करायची खूप इच्छा आहे. जे मोजके सिनेमे मी केले त्यातला हा “विनाकारण राजकारण” हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, आणि त्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मला हे Award ही मिळाला. माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे, कारण हे सिनेमाचं Award आहे.”

कारण सांगताना रुपाली पुढे म्हणाली, “ज्यावेळेला मी या क्षेत्रात यायचं ठरवलं, या क्षेत्रातला येण्याचा मार्ग अगदी थिएटर मध्ये अंधारात जेव्हा आपण आपली seat शोधत असतो आपण चाचपडतो थोडं धडपडतो आणि मग शेवटी आपल्याला आपली सीट मिळते. तसंच मी जेव्हा या क्षेत्रात आले, त्यावेळेला चाचपडत नाटक क्षेत्रात प्रवेश केला आणि तिथे मला माझी सीट मिळाली, मग सिरीयलच्या मार्गात चाचपडले आणि तीही माझी सीट आज मला मिळाली आहे. कदाचित हे जे सिनेमाचं अवॉर्ड मला मिळालं आहे ते कदाचित एक संकेत असू शकतं.... “विनाकारण राजकारण” च्या पूर्ण टीमचे आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल या टीमचे मी खूप खूप आभार मानते...”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

VIDEO : PM मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून, बघा काय म्हणाले?

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

SCROLL FOR NEXT