Ruhaanika Dhawan New house Instagram @ruhaanikad
मनोरंजन बातम्या

Ruhaanika Dhawan: १५ वर्षीय अभिनेत्री झाली कोट्यवधींची मालकीण, संपत्ती पाहून चक्रावून जाल

पंधरा वर्षीय अभिनेत्री रुहानिकाची मोठी भरारी.

Pooja Dange

Ruhaanika Dhawan New House: स्वतःच घर घेणं अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करताना संपूर्ण आयुष्य खर्ची करावा लागत. परंतु १५ वर्षीय एका अभिनेत्रीने तिचे स्वतःचे घर खरेदी केले आहे. अभिनेत्री रुहानिकाने एक आलिशान घर खरेदी केले आहे. रुहानिकाने ही माहिती तिच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवरून शेअर केली आहे.

रुहानिकाने तिच्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रुहानिका तिच्या यशाचे श्रेय तिच्या फॅन आणि सहकलाकारांना देते. तसेच जीवनात पुढेही यश मिळावे अशी ती प्रार्थना करत आहे. रुहानिका तिच्या या यशाने खूप आनंदी आहे.

रुहानिकाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, तिचे स्वप्न पूर्ण झाले, याचा तिला खूप अभिमान आहे. जे स्वप्न तिने पहिले होते ते पूर्ण झाले. तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिच्यासह तिचे आई-वडील सुद्धा दिसत आहेत. ती घर खरेदी करू शकली याचे श्रेय ती तिच्या आईला देते.

सगळ्या भारतीय महिलांप्रमाणे तिच्या आईनेही पैशांची बचत केली आणि त्यांना डबल केले. तिने हे कसे केले याची कल्पना तिला आणि देवाला असेल, असे रुहानिका म्हणाली आहे. रुहानिका म्हटले आहे 'ही तर सुरूवात आहे अजून खूप काही करायचे आहे.'

रुहानिकाने 'ये हैं मोहब्बतें' या टीव्ही मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिने 'रुही' ही भूमिका साकारली होती. दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होते. रुहानिका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास २ मिलियन फॉलोवर्स आहेत. रुहानिका तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Money: कपाटात पैसे ठेवण्याविषयीच्या 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: परळीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; ५० जणांना चावा

Health Tips: डायबिटीजसाठी कारलेच नाही, 'या' ५ भाज्याही गुणकारी, साखर राहील कंट्रोलमध्ये

Eye Care Tips: चष्म्याचा नंबर वारंवार वाढतोय? रोज करा 'हे' ७ सोपे उपाय; नजर राहील तीक्ष्ण

Eyebrow Tips : आयब्रो पेन्सिल घेताना 'या' ८ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; पातळ भुवयांवरही मिळेल इन्स्टंट ग्लॅमरस लुक

SCROLL FOR NEXT