Juhi Parmar Faced Casting Couch Saam Tv
मनोरंजन बातम्या

Juhi Parmar : वयाच्या १७ व्या वर्षीच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली कास्टिंग काऊचची शिकार, स्वत:च केला खुलासा

Juhi Parmar Faced Casting Couch : टेलिव्हिजन अभिनेत्री जुही परमारने एका मुलाखतीत केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे ती पुन्हा चर्चेत आलीय. वयाच्या १७ व्या वर्षी घडलेला भयानक अनुभव तिने एका मुलाखतीतून सांगितला आहे.

Chetan Bodke

टेलिव्हिजन अभिनेत्री जुही परमारने अनेक टीव्ही सिरीयलमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तिला सर्वाधिक प्रसिद्धी 'कुमकुम- एक प्यारा सा बंधन'या सीरियलमधून मिळाली होती. आता जुही परमारने एका मुलाखतीत केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे ती पुन्हा चर्चेत आलीय. अभिनेत्रीने दिलेल्या मुलाखतीत ती कास्टिंग काऊचची शिकार झाल्याचं सांगितलंय. वयाच्या १७ व्या वर्षी तिला हा भयानक अनुभव आल्याचं तिने सांगितले आहे.

हॉटरफ्लाईला दिलेल्या मुलाखतीत जुही परमारने सांगितले की,"माझ्यासोबत जेव्हा कास्टिंग काऊचचा प्रकार घडला तेव्हा मी १७ वर्षांचे होते. मला एका चॅनल हेडने म्युझिक अल्बमच्या शुटिंगसाठी बोलवलं होतं.शुटिंगसाठी त्या चॅनल हेडने मला कॅमेऱ्याच्या समोर बिकीनी घालण्यास सांगितलं होतं.पण मी या गोष्टीसाठी त्यांना नकार दिला होता."

"कधी कधी काही गोष्टींसाठी कॉम्प्रमाईज करावं लागतं,असा सल्ला मला त्या चॅनल हेडने दिला होता. त्यांना मी बोल्ड सीन्स देण्यासाठी नकार दिल्यामुळे ते माझ्यावर भडकले होते.चॅनल हेडला मी बोल्ड सीन्ससाठी नकार दिल्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीत तू असं वागलीस तर टिकशील का? असा प्रश्न विचारला केला.पण त्यांच्या कोणत्याही प्रश्नाला मी उत्तर न देता,तिकडून निघून आले." जुही परमार एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून तिने अनेक टीव्ही सिरीयलमध्ये प्रमुख भूमिका साकारल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

SCROLL FOR NEXT